धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती
ADVERTISEMENT
दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हीडिओ तयार करून ते मोबाइलवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. अमरावतीतल्या तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी 19, 20 आणि 22 अशा तिघांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ ब व पॉक्सोमधील कलम ६, १४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना अटकही करण्यात आली आहे.
बलात्कार पीडितेचं जगणं झालंय मुश्कील, ‘तो’ Video व्हायरल झाल्याने 5 वर्षापासून पीडिता घरातच
काय आहे नेमकं प्रकरण?
अमरावतीतल्या तिवसा या ठिकाणी राहणाऱ्या तीन तरूणांनी त्यांच्या ओळखीच्या दोन मुलांचा अश्लील व्हीडिओ तयार केला. या अल्पवयीन मुलांचं वय अनुक्रमे 9 आणि 11 वर्ष असं आहे. अश्लील व्हीडिओ तयार करून तो व्हायरलही करण्यात आला. ही बाब या मुलांपैकी एकाच्या पालकांना समजली. त्यांनी या विरोधात तक्रार दिली आहे त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला. पीडित मुलं या प्रकारामुळे अत्यंत घाबरून गेली आहेत.
तिवसा येथील रहिवासी असलेल्या तिघा युवकांनी परिचित असलेल्या दोन बालकांना आठ दिवसांपूर्वी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास गावातील एका ठिकाणी नेले. आपण नवीन प्रकारचा व्हिडीओ तयार करु, असे या तिघांनी दोन बालकांना सांगितले. त्या बालकांना अश्लील कृत्य करण्यास सांगितले.
ऑनर किलिंग! पतीने केली पत्नीची हत्या, मुंडकं रस्त्यावर मिरवलं; व्हायरल व्हीडिओमुळे खळबळ
त्यानंतर या तिघांनी दोन बालकांचा एकत्रितपणे अश्लील व्हिडीओ तयार केला. त्यानंतर पीडित मुलांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.
चाइल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदे केल्यानंतर त्याबाबत धडक कारवाया सुरू आहेत. चाईल्ड पॉर्न व्हिडिओ • किंवा त्यासंबंधित कोणता व्हिडिओ, फोटो कुणाला पाठवला, तर संबंधितास तुरुंगात जावे लागू शकते. चाईल्ड पॉर्न बनवणे, पाहणे, फॉरवर्ड करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे भारतात कायद्याने गुन्हा आहे. असे असूनही वारंवार अशा घटना घडत आहेत. बालकांचे लैंगिक शोषण ही फार गंभीर बाब असून अजाणत्या मुलांच्या अश्लील चित्रफिती तयार करणे, इंटरनेटवर अपलोड करणे किंवा सोशल मीडियावर व्हायरल करणे हा गुन्हा आहे.
ADVERTISEMENT