दुबईत ब्रेनवॉश, जॉर्जियात ट्रेनिंग… अमृतपाल सिंग असा झाला ISI चा बाहुला

मुंबई तक

20 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:09 PM)

Amritpal Singh News : चंदीगढ : पंजाब (Punjab) पोलिसांनी ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग (Amritpal Singh) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध धडक कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अमृतपाल सिंगच्या तब्बल 112 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तो स्वत: फरार झाला आहे. पोलिसांनी विविध पथक तयार करुन अमृतपालचा शोध जारी ठेवला आहे. दरम्यान, अमृतपालविरुद्धच्या आतापर्यंतच्या […]

Mumbaitak
follow google news

Amritpal Singh News :

हे वाचलं का?

चंदीगढ : पंजाब (Punjab) पोलिसांनी ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग (Amritpal Singh) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध धडक कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अमृतपाल सिंगच्या तब्बल 112 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तो स्वत: फरार झाला आहे. पोलिसांनी विविध पथक तयार करुन अमृतपालचा शोध जारी ठेवला आहे. दरम्यान, अमृतपालविरुद्धच्या आतापर्यंतच्या तपासात तो दुबईत आयएसआयच्या संपर्कात आल्याचं समोर आलं आहे. यानंतर त्याला ISI कडून जॉर्जियामध्ये प्रशिक्षण देण्यातही आलं. तसंच अमृतपाल हा बंदी असलेल्या खलिस्तानी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’शी संबंधित आहे. (Amritpal Singh is the head of the Punjab De Waris organization.)

अमृतपाल प्रकरणात आतापर्यंत अने मोठे खुलासे :

– भारतात येण्यापूर्वी अमृतपालला जॉर्जियामध्ये ISI कडून प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

– अमृतपालने पंजाबमध्ये दहशतवादाला पुन्हा अॅक्टिव्ह करण्याची योजना आखली होती.

-अमृतपालचे शिख फॉर जस्टिस या बंदी असलेल्या खलिस्तानी संघटनेशीही संबंध आहे.

– त्याला आयएसआयकडून निधी, दहशतवाद्यांना आश्रयस्थान आणि ड्रोनद्वारे शस्त्रं पुरवली जात होती.

– दुबईत असताना अमृतपाल आयएसआयच्या संपर्कात आल्याचं तपासात समोर आलं आहे.

– आयएसआयने अमृतपालला निधी दिला आणि तो पाकिस्तानच्या पाठिंब्याने भारतात खलिस्तानी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी परतला.

– पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. भारताविरुद्ध तो अनेकदा युद्धात पराभव झाला आहे.अशा परिस्थितीत ते कधी जम्मू-काश्मीरमध्ये तर कधी पंजाबमध्ये कट रचत आहेत. यावेळी आयएसआयने अमृतपालला भारताविरुद्ध शस्त्र बनवलं.

अमृतपाल आपली फौज तयार करत होता :

या प्रकरणात आतापर्यंतची सर्वांत मोठी आणि चिंतेची गोष्ट म्हणजे अमृतपाल स्वतःची फौजही तयार करत होता. ‘आनंदपूर खालसा फोर्स’ या नावाने स्वतःती फौज तयार करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांना अमृतपालच्या घरातून या फौजचं नाव असलेले अनेक जॅकेटही जप्त केले. याशिवाय जल्लूपूर गावातील त्याच्या घराच्या गेटवर आणि भिंतीवर, घरातून आणि साथीदारांच्या जप्त केलेल्या हत्यारांवर या फोर्सच्या नावाचा उल्लेख केला आहे. यामुळे अमृतपाल सिंग हा आनंदपूर खालसा फोर्स नावाने ‘खाजगी सैन्य’ तयार करत असल्याचे मोठे पुरावे मिळाले.

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी मोठी घडामोड, थेट गुजरातमधून अटकेची कारवाई

चार समर्थकांची डिब्रुगडला रवानगी :

आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्यांपैकी अमृतपाल सिंगच्या चार साथीदारांना आसाममधील डिब्रुगडला पाठवण्यात आलं आहे. अमृतपालचे काका आणि ड्रायव्हर यांनीही आत्मसमर्पण केलं आहे. याशिवाय अमृतपालची PB 10 FW6797 क्रमांकाची एसयूव्ही जालंधरमधील महतपूरच्या सलीना गावातून जप्त करण्यात आली आहे. या वाहनातून फरार अमृतपाल सिंग पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. याच वाहनातून 315 बोअरची रायफल, 57 जिवंत काडतुसे, एक तलवार आणि वॉकीटॉकी सेट जप्त करण्यात आला आहे. हे वाहन अनोखरवाल येथील मनप्रीत सिंगचं आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे.

कोण आहे अमृतपाल सिंग?

अमृतपाल सिंग वारिस दे पंजाब या संघटनेचा म्होरक्या आहे. या संघटनेची स्थापना अभिनेता दीप सिद्धूने केली होती. पण गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू झाला होता. दीप सिद्धूवर लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचाही आरोप होता. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर दुबईहून परतलेल्या अमृतपाल सिंगने या संघटनेची जबाबदारी स्वीकारली. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याने ‘वारीस दे पंजाब’ ही वेबसाईट सुरु करून लोकांना जोडण्यास सुरुवात केली.

अजनाला येथील पोलीस ठाण्यावर शस्त्रांनी सशस्त्र हल्ला :

अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांनी मागील महिन्यात पंजाबच्या अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. अपहरण आणि दंगलीतील एका आरोपीच्या सुटकेसाठी त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात धडक दिली होती. यावेळी सहा पोलीस जखमी झाले होते.

याच दरम्यान, अमृतपालच्या एका जुन्या साथीदाराने अमृतपालविरोधात तक्रार दाखल केली. यात या सर्वांनी अजनालामधून बरिंदर सिंग नावाच्या व्यक्तीचं अपहरण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रिक्षात अश्लील चाळे; प्रेमी युगुलाला हटकलं, प्रियकराने टाकला रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड अन्…

या प्रकरणानंतर पंजाब पोलिसांनी अमृतपालच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. ‘वारीस दे पंजाब’ संघटनेशी संबंधित लोकांचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचं समोर आलं. यात लोकांमध्ये शत्रुत्व पसरवणं, खुनाचा प्रयत्न करणं, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं असे गुन्हे दाखल आहेत. याच अनुषंगाने 24 फेब्रुवारीला अजनाळा पोलीस ठाण्यात संघटनेच्या लोकांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये अमृतपाल सिंग हा देखील आरोपी आहे.

PM मोदींसह अमित शाहंना धमकी :

अमृतपाल सिंहने यापूर्वी आम्ही खलिस्तानचा मुद्दा अतिशय शांततेच्या मार्गाने पुढे नेत असल्याचं म्हटलं होतं. जर लोकं हिंदु राष्ट्राची मागणी करू शकतात तर आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही? असं तो म्हणाला होता. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना खलिस्तानला विरोध करण्याची किंमत मोजावी लागली होती. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, मग ते पंतप्रधान मोदी असोत, अमित शहा असोत किंवा भगवंत मान असोत. माझ्यावर आणि माझ्या समर्थकांवर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत, अशी धमकी त्याने दिली होती.

    follow whatsapp