धुळ्यात आनंदाच्या शिध्यातून गोडवा गायब! गरिबांसाठीच्या किटमध्ये साखर नाही

मुंबई तक

• 07:24 AM • 26 Oct 2022

गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे सरकारने आनंद शिधा वाटप सुरू केली आहे मात्र या आनंदाच्या शिध्यातून साखरच गायब झाली असून हा सुद्धा वाटप करताना लाभार्थींकडून मात्र पैसे पूर्ण घेण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नेमकी काय घडली घटना? दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने रेशनकार्ड धारकांना आनंदाच्या शिध्याचं संपूर्ण राज्यात वाटप करण्यात येत […]

Mumbaitak
follow google news

गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे सरकारने आनंद शिधा वाटप सुरू केली आहे मात्र या आनंदाच्या शिध्यातून साखरच गायब झाली असून हा सुद्धा वाटप करताना लाभार्थींकडून मात्र पैसे पूर्ण घेण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

नेमकी काय घडली घटना?

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने रेशनकार्ड धारकांना आनंदाच्या शिध्याचं संपूर्ण राज्यात वाटप करण्यात येत आहे मात्र काही ठिकाणी हा शिधा पोहोचलाच नाही. यामुळे लाखो लाभार्थ्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही तुळशी विवाह पर्यंत दिवाळी असते तोपर्यंत हा शिधा पोहोचेल असं अजब वक्तव्य आज दीपक केसरकर यांनी केल्यानंतर धुळे शहरात मात्र एक नवीनच प्रकार याबाबत समोर आला आहे .

आनंदाच्या शिध्यातून साखर गायब

आनंदाच्या शिध्यासाठी लाभार्थ्यांकडून पूर्ण पैसे घेतले जात आहेत, मात्र चार वस्तूंपैकी फक्त तीनच वस्तू लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत यातील साखर मात्र अद्याप लाभार्थ्यांना मिळालेली नाही, यामुळे दिवाळी गोड करणारा आनंद शिधा मधून साखरच गायब झाल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. साखर घेण्यासाठी परत पुढील काही दिवस लाभार्थ्यांना वाट बघावी लागणार आहे.

आनंदाचा शिधा योजना काय आहे?

राज्यातल्या १ कोटी ६२ लाख ४२ हजार शिधापत्रिकाधारकांसाठी शिंदे फडणवीस सरकारने 4 ऑक्टोबरला मोठा निर्णय घेतला. या सगळ्यांना दिवाळीसाठी रवा, चणाडाळ, साखर आणि तेल १०० रूपयात दिलं जाणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ५०० कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. निर्णय़ घेतला त्याचवेळी दिवाळी तोंडावर आली होती त्यामुळे कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा यासाठी अन्न आणि नागरि पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची करेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा शिधा लोकांना म्हणावा तसा मिळालाच नाही अशा तक्रारी येत आहेत.

कोरोनामुळे दोन वर्षे दिवाळी साजरी करता आली नाही. त्यातच अजूनही अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्याने ते देखील संकटात सापडले आहेत. अशात सरकारने घोषणा केलेल्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाच्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ‘आनंदाचा शिध्या’तून कधी तेल गायब तर कधी साखर गायब होत असल्यानं नागरिकांना अतिरिक्त पैशांचा भुर्दंड लागतो आहे.

    follow whatsapp