ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे विवाहबंधनात अडकणार आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अलानाच्या लग्नाच्या बातम्या येत असताना तिची आई डीन पांडेचीही खूप चर्चा होत आहे. ती 54 वर्षांची आहे.
स्टाइलच्या बाबतीत डीन मॉडेल-अभिनेत्रींनाही मागे टाकेल असा तिचा अंदाज आहे. अनन्याची ही काकू एक आरोग्य प्रशिक्षक, फिटनेस तज्ज्ञ आणि लेखिका आहे.
डीन तिचे फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेक सेलिब्रिटींना तिने फिटनेसचे प्रशिक्षणही दिलं आहे.
एक आरोग्य तज्ज्ञ म्हणून, ती तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगीआणि हलका आहार घेते. तिला जीममध्ये व्यायाम करण्यापेक्षा योगा करणं आवडतं.
डीन 20 वर्षांपासून योगा करतेय, ज्यामुळे ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट आहे.
सोशल मीडियावरही ती नेहमी अॅक्टिव्ह असते. व्हिडीओ आणि फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे.
ADVERTISEMENT