बळी देत असताना बकऱ्याऐवजी त्याला धरणाऱ्या माणसाच्या गळ्यावरून सुरी फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नेशत एका तरूणाने बकऱ्याच्या ऐवजी बकरा ज्याने पकडला होता त्याच माणसाच्या गळ्यावरून सुरी फिरवली. आंध्रप्रदेशातल्या चित्तूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला रूग्णालायत दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
चित्तूरमधल्या वलसापल्लेमध्ये संक्रातीनिमित्त यल्लमा मंदिरात बळी दिला जातो. आरोपी चलापथी जनावरांचा बळी दे होता. त्यावेळी 35 वर्षांचा सुरेश हा माणूस बकऱ्याला धरून उभा होता. त्यावेळी चलापथीने बकऱ्याऐवजी सुरेशची मान कापली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चलापथी नशेत होता. त्याने बकऱ्याच्या जागी सुरेशच्या मानेवर सुरी फिरवली.
या घटनेत गंभीर जखमी सुरेशला मदनपल्ले येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. चलापथीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. सुरेश विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. चलापथी आणि सुरेशचा काही जुना वाद होता का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
यल्लमा देवीच्या प्राचीन मंदिरात मकर संक्रातीला बळी दिला जातो ही गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आहे. संक्रातीच्या दिवशी मंदिर परिसरात येतात आणि त्यांचा बळी देतात. सुरेशही बळी देण्यासाठीच बकऱ्याला घेऊन मंदिरात आला होता. आता या घटनेत त्यालाच प्राण गमवावे लागले आहेत.
ADVERTISEMENT