बीडमध्ये असणाऱ्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्य पेटून उठलं. ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांमधून गुन्हेगारांवर कठोरात कठोर शिक्षा लावण्याची मागणी केली जाऊ लागली. देशमुख कुटुंबाकडून आंदोलनही करण्यात आलं. त्यानंतर आता या खून आणि खंडणीच्या प्रकरणातील आरोपींवर मकोका दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या आरोपींचा पाय खोलात गेला आहे. या संपूर्ण प्रकरणात अंजली दमानिया यांनी आतापर्यंत वेगवेगळे खुलासे करत खळबळ उडवून दिलेली राज्याने पाहिली. त्यानंतर या प्रकरणात देशमुख कुटुंब आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून, तसंच भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी होत असतानाच निकम यांच्याबद्दल एक दावा दमानिया यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Solapur Truck Accident : आईसोबत ट्यूशनला निघालेल्या चिमुकलीला ट्रकने चिरडलं, सोलापुरात संताप
ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस दिली जावू नये अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. यासाठी त्यांनी एक कारण समोर ठेवलं असून, उज्ज्वल निकम यांच्या मुलानेच एका घोटाळ्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची वकिली केली होती असं दमानिया म्हणत आहेत. त्यासंदर्भातील काही कागदही त्यांनी आपल्या सोशल मिडियावरुन शेअर केले आहेत
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
हे ही वाचा >> Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांचा खून, तिसरा भाऊ गंभीर जखमी, घडलंय तरी काय?
"DCC बँक च्या घोटाळ्यात धनंजय मुंडे यांची जगमित्र स्पिनिंग मिल च्या bail साठी त्यांचे वकील एडव्होकेट अनिकेत निकम होते, जे उज्वल निकम यांचे सुपुत्र आहेत. आज बातमी होती की मुख्यमंत्री, हे उज्वल निकम यांना भेटले. त्यांना ही केस देणे योग्य ठरणार नाही. उज्वल निकम यांच्याबद्दल अनादर नक्कीच नाही, पण in all fairness and in the interest of justice, मुख्यमंत्र्यांनी ही केस दुसऱ्या एका तज्ज्ञ वकिलांकडे द्यावी."
ADVERTISEMENT
