‘मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं कचऱ्यात खाल्ले, नाल्यात खाल्ले. महापालिकेत उंदीर मारण्यात घोटाळा झाला. पाच वार्डात उंदीर मारले खर्च झाला एक कोटी. किती मारले? कुठे पुरले? नोंद कुठे केली? फाईल दाखवा तर म्हणतात पुरात वाहून गेली? वाघ म्हणता उंदरात पण खाता? खाण्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी चारा घोटाळ्यातील लालूंच्या मुलाला भेटायला गेला होता काय?, असा सवाल करत आशिष शेलार यांनी ठाकरेंवर प्रहार केला.
ADVERTISEMENT
भाजपच्या जागर मुंबईचा अभियानांची 14वी सभा माहीम विधानसभा मतदारसंघातील प्रभादेवी येथे पार पडली.
या सभेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘प्रभादेवी मंदिर समोर सापडलेला अन्य धर्मीयांचा दगड आमच्या मंदिराच्या दरवाज्यात तुमच्या नगरसेविकेने का ठेवला? माहिमचं दत्त मंदिर पुनर्निर्माण करण्याऐवजी ते तोडलं पाहिजे अशी नोटीस निघते कशी? कोरोना काळात याकूब मेमन थडग सुशोभीकरण केले जाते’, हे मुद्दे उपस्थित करत शेलारांनी ठाकरेंना सवाल केले.
‘दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज्याकडे पुरावे मागितले जातात. औरंगजेबाचे स्वप्न उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले’, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
‘श्रद्धा वालकरने महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहिले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी टेबलवर सेटलमेंट केली. तिला तक्रार मागे घ्यायला लावली. त्याला एक महिना उशीर लावला. त्यावर दबाव कुणाचा होता? मनामध्ये प्रश्न येतो की, ती वालकर होती म्हणून तर तिच्यावर दबाव नव्हता ना की, तो आफताब होता म्हणून पोलिसांवर दबाव नव्हता ना? उद्धवजी त्यावर एक चकार शब्द काढला तयार होत नाही. केवळ मुस्लिम मतासाठी हे लांगुलचालन सुरू आहे’, म्हणत शेलारांनी ठाकरेंना लक्ष्य केलं.
“कटोरा घेवुन पुढे पुढे करणारी उद्धवजी यांची शिवसेना”
‘२०१९ च्या आधी शिवसेनेने काँग्रेसबरोबर जाणार होते ते भाजपाला संपविण्यासाठी ना? लाल किल्ल्यावर गेलेल्या बांधवांना भेटून मोदींना संपविण्याचा प्रयत्न तुम्ही केली ना? भाजपाला संपविण्यासाठी शिवसेनेने खोदलेल्या खड्ड्यात ती स्वतः पडली’, असा आरोप शेलारांनी केला.
‘काँगेस आणि राष्ट्रवादीबरोबर भाजपाला संपविण्यासाठी गेला ना? पृथ्वीवर एकच पक्ष असा आहे ज्याला आत्मपरीक्षण करता येत नाही तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष..स्वतःची चूक यांना दिसत नाही. उरलेली शिवसेना उसनवारीची आहे. ती मुंबईचं करू शकत नाही. आदित्य ठाकरे कटोरा घेवुन बिहारला भिक मागायला गेले. कटोरा घेवुन पुढे पुढे करणारी उद्धवजी यांची शिवसेना आहे’, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
‘२२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे?’, असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला.
‘प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे’, असं म्हणत शेलारांनी ठाकरेंवर प्रहार केला.
ADVERTISEMENT