शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोड येथील सभेत आदित्य ठाकरेंचं कार्टून लावण्यात आलं आहे. औरंगाबादमधल्या सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे समोरासमोर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे व्यंगचित्र चर्चेचा विषय ठरलं आहे. सोशल मीडियावरही या व्यंगचित्राची चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे व्यंगचित्र?
आदित्य ठाकरे सत्ता असताना त्या खुर्चीत झोपले आहेत असं दाखवण्यात आलं आहे. त्यांच्याकडे एक शेतकरी आला आहे, हा शेतकरी म्हणतो साहेब उठा शेतकरी संकटात आहे. तर याच व्यंगचित्राच्या शेजारी दुसरं चित्र दाखवण्यात आलं आहे सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत आणि शेतकऱ्यांची विचारपूस करत आहेत. सत्ता असताना ठाकरेंनी काही केलं नाही आणि सत्ता गेली म्हणून शेतकऱ्यांची आठवण आली हे या व्यंगचित्रातून ध्वनित करण्यात आलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी याबाबत म्हटलं आहे?
अब्दुल सत्तार म्हणाले की, खरं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी सभा रद्द केल्याचे मला कळालं होतं. त्यांची सभा रद्द झाल्याने किमान त्यांचे व्यंगचित्र तरी आमच्या सभेत लोकांना पाहायला मिळाला पाहिजे. सत्तेत असताना कशाप्रकारे झोपले होते आणि सत्ता जाताच आता शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत. विशेष म्हणजे पाऊस गेला, सोगणी झाली असून, शेतात आता पिकांचे धसकट उरली आहे. त्यामुळे शेतं रिकामी झाल्यावर आणि कापसाच्या पिकांचे नकट्या राहिल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर येत असतील तर धन्य आहे, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. तर विरोधकांची आता एक कार्यशाळा घेण्याची गरज असून, विरोध कधी करायचा याबाबत तरी त्यांना यातून कळेल असेही सत्तार म्हणाले.
ADVERTISEMENT