पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही, आम्ही समोरुन कोथळा काढतो – संजय राऊत

मुंबई तक

• 10:15 AM • 04 Sep 2021

– स्मिता शिंदे, जुन्नर प्रतिनिधी शिवसेना आणि भाजप यांच्यातला वाद काहीकेल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेल्या अटकेनंतर दोन्ही पक्षांमधला दुरावा आणखीन वाढल्याचं दिसतंय. मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता शिवसेनेवर पाठीत खंजीर खुपसल्याची टीका केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देत पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची […]

Mumbaitak
follow google news

– स्मिता शिंदे, जुन्नर प्रतिनिधी

हे वाचलं का?

शिवसेना आणि भाजप यांच्यातला वाद काहीकेल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेल्या अटकेनंतर दोन्ही पक्षांमधला दुरावा आणखीन वाढल्याचं दिसतंय. मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता शिवसेनेवर पाठीत खंजीर खुपसल्याची टीका केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर देत पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नसल्याचं म्हटलं आहे.

पूर्वी खंजीर खुपसणे फक्त पवार साहेबांबद्दल बोलत होते, आता उद्धव ठाकरेंबद्दल बोललं जातंय. मी चंद्रकांत पाटलांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून वार करण्याची परंपरा आमच्यात नाही. शब्द तर तुम्ही फिरवलात आम्ही नाही, मग आता युती कशी होणार? जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.

पायघड्या घातल्या तरीही युती होणार नाही, BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं विधान

यादरम्यान शिवसेनेवर टीका करणाऱ्या विरोधकांनाही संजय राऊतांनी खडे बोल सुनावले. “शिवसेना संपावी म्हणून गेल्या ५० वर्षांपासून अनेक जणं देव पाण्यात ठेवून बसले आहेत, पण ते अजुनही शिवसेनेला संपवू शकले नाहीत. आज आपण कोरोना काळात जसा ऑक्सिजन चा प्लॅन्ट टाकतो तसाच बाळासाहेबांचा ऑक्सिजन शिवसैनिक होता ते त्याला जपत होते. जुन्नरचा सैनिक रांगडा आहे हे त्यांचं वेगळेपण आहे. निवडूनका येतात जातात त्या साठी शिवसेनेचा जन्म नाही…मात्र राजकारणात टीकायचं असेल तर प्रत्येक निवडणूक अटी तटीची आहे हे पाहून आपण लोकसभा आणि विधानसभेला भगवा फडकवूच”, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात तीन पक्षांचे पक्षाचे सरकार आहे पण ज्याचा मुख्यमंत्री असतो त्याचंच सरकार असते, ठाकरे सरकार! ठीक आहे सगळे आपलेच आहेत. पवार साहेब तर आपलेच आहेत, असतील आणि राहतील…पण शिवसेना सर्वात वर आहे. शिवसेनेची गरज सर्वांना लागते, भाजपला सुद्धा लागते. याला पॉवर म्हणतात, अशा शब्दात ठाकरे सरकारचं कौतुक केलं.

लोकसभेत 560 तर राजसभेत 280 सभासद आहेत मात्र कोणी कोणाला ओळखत नाही.आले किती गेले किती मात्र शिवसेनेच्या खासदार दिसला की माणसं आदबीने थांबतात असा उल्लेख संजय राऊत यांनी केला.

अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला हरकत नाही, पण…; शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्त्र

    follow whatsapp