नटरंग या मराठी सिनेमामधील मला जाऊ द्या ना घरी या गाण्यावर अमृता खानविलकर या अभिनेत्रीने केलेला डान्स चांगलाच गाजला. तिच्या या गाण्यावर आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात. नटरंग सिनेमानंतर महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी मला जाऊ द्या ना घरी हे गाण गाजलं होतं. या गाण्याची लोकांमध्ये आजही तितकीच क्रेझ आहे. बारामतीमधल्या एका रिक्षावाल्याचा मला जाऊ द्या ना घरी गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडीओतील रिक्षावाल्याचे हावभाव, त्याच्या अदा पाहण्यासारख्या आहेत. लावणी या नृत्यप्रकारात हावभावांना खूप महत्व असतं, आणि हेच हावभाव या रिक्षाचालकाने अगदी चपखलपणे आपल्या डान्समध्ये आणल्यामुळे सोशल मीडियावर याचं कौतुक होताना दिसतंय. बाबाजी कांबळे असं या रिक्षाचालकाचं नाव असून ते बारामती तालुक्यातल्या गुणवडी गावचे रहिवासी आहेत. पेशाने रिक्षाचालक असलेले बाबाजी कांबळे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
बारामतीचा रिक्षावाला Viral Videoवर काय म्हणतो?
काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या बाबाजी कांबळे यांना त्यांच्या मित्रांनी डान्स करण्याचा आग्रह केला. या आग्रहाखातर कांबळे यांनी पेट्रोलपंपावरच ठेका धरला. हा व्हिडीओ बाबाजी यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर सर्व स्तरातून बाबाजी यांचं कौतुक होताना दिसत आहे.
Budget : ७२ मिनिटांच्या भाषणात पेट्रोल-डिझेलचा साधा उल्लेखही नाही
महाराष्ट्रात तुफान व्हायरल झालेल्या व्हीडिओवर रिक्षाचालक बाबाजी कांबळे काय म्हणतात?
… जेव्हा रस्ता चुकलेल्या सचिन तेंडुलकरला रिक्षावाला रस्ता दाखवतो
Mumbai मध्ये रिक्षा चालकाला जाब विचारला म्हणून कट मारून बाईकस्वाराला उडवलं
ADVERTISEMENT