बिग बींनी घेतली कोरोनाची लस; ब्लॉगद्वारे शेअर केला लसीकरणाचा अनुभव

मुंबई तक

• 09:40 AM • 02 Apr 2021

संपूर्ण देशभरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. राज्यात देखील लसीकरणाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. अशातच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील लसीकरण करवून घेतलं आहे. तर नुकतंच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. बिग बी अमिताभ यांनी लस घेतली असल्याचं त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे. अमिताभ यांनी याबात ट्विट केलंय. अमिताभ म्हणतात, […]

Mumbaitak
follow google news

संपूर्ण देशभरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. राज्यात देखील लसीकरणाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. अशातच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील लसीकरण करवून घेतलं आहे. तर नुकतंच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.

हे वाचलं का?

बिग बी अमिताभ यांनी लस घेतली असल्याचं त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे. अमिताभ यांनी याबात ट्विट केलंय. अमिताभ म्हणतात, “कोरोनाची लस घेतली. सर्व काही ठीक आहे.” तर कोरोनाची लस घेणाऱ्या सेलेब्रिटींच्या यादीमध्ये आता अमिताभ यांचं नाव आलं आहे.

तर शुक्रवारी सकाळी अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे लसीकरणाचा अनुभव शेअर केला आहे. ते लिहितात, “लसीकरण झालं. सर्व ठीक आहे. कुटुंबाची आणि स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल आला… सर्वजण निगेटीव्ह आहोत, त्यामुळे लगेच लस घेतली. संपूर्ण परिवाराने लस घेतली. अभिषेक कामानिमित्त बाहेर असल्याने त्याने लस घेतली नाही. काही दिवसात परत आल्यावर तो देखील लस घेईल.”

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यापूर्वी सलमान खान, सैफ अली खान, रोहित शेट्टी तसंच राकेश रोशन यांनीही लस घेतली होती.

    follow whatsapp