Shiv Sena आमदार भास्कर जाधवांना मोठा धक्का, ‘या’ निवडणुकीत MVAचा पराभव

मुंबई तक

25 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:12 AM)

Shiv Sena MLA Bhaskar Jadhav’s panel defeat: रत्नागिरी: गुहागर (Guhagar) तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनलने वर्चस्व राखत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेना नेते (ठाकरे गट) आणि गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धक्का बसला आहे. भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi ShivSena) पक्षाच्या सहकार पॅनलचे 12 […]

Mumbaitak
follow google news

Shiv Sena MLA Bhaskar Jadhav’s panel defeat: रत्नागिरी: गुहागर (Guhagar) तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनलने वर्चस्व राखत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेना नेते (ठाकरे गट) आणि गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धक्का बसला आहे. भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi ShivSena) पक्षाच्या सहकार पॅनलचे 12 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. ही निवडणूक आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांना त्यात अपयश आलं. (big blow to shiv sena mla bhaskar jadhav mva defeat in buying and selling union elections guhagar)

हे वाचलं का?

विशेष म्हणजे गुहागरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय जयदेव मोरे यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. मुख्य म्हणजे अनेक वर्षे गुहागर सोसायटी, खरेदी विक्री संघ, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पद भूषवणारे राष्ट्रवादीचे गुहागर तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.

‘राष्ट्रवादीची शिवसेना’ : ‘त्या’ संभाषणावर भास्कर जाधव अन् अजित पवार पहिल्यांदाच बोलले…

गुहागर तालुका खरेदी विक्री संघाची 2022-23 ते 2027-28 च्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वपक्षीय निवडणूक नुकतीच पार पडली. एकूण 15 संचालक पदासाठी निवडणूक होती. त्यापैकी छाननीमध्ये भटके विमुक्त प्रवर्गात एक अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सचिन बाईत बिनविरोध निवडून आले होते. मात्र, विकास सहकारी संस्था मतदार संघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सहकार पॅनलचे 12 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडून आले.

कोणी मारली बाजी?

सहकार पॅनलचे सहकारी संस्था मतदार संघातून श्रीकांत महाजन 12 मते, डॉ. अनिल जोशी, शाम गडदे, सिराज घारे यांना 11 मते पडून विजयी झाले. रविंद्र अवेरे, सुरेश चौगुले, लक्ष्मण शिगवण, गणेश तांबे यांनी 10 मते घेऊन तर महाविकास आघाडीचे पंकज बिर्जे, पांडुरंग कापले यांना 10 मते मिळवून विजय मिळवला.

सहकार पॅनलचे नारायण गुरव यांना 10 मते पडली होती परंतु ईश्वरी चिठ्ठीमध्ये त्यांना विजयाने हुलकावणी दिली. महिला मतदार संघातून सहकार पॅनलच्या अश्विनी आनंद जोशी, रश्मी रघुनाथ घाणेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया सुधाकर साळवी, सुवर्णा दिनानाथ भोसले यांचा पराभव केला.

Video : भास्कर जाधव २० वर्षांनी पुन्हा बनले ट्रक ड्रायव्हर!

तर इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून सहकार पॅनलचे तवसाळ पडवे सोसायटी चेअरमन सुभाष कोळवणकर यांनी गुहागरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय जयदेव मोरे यांचा पराभव केला.

मागासवर्गीय मतदार संघात सहकार पॅनलचे पंचायत समिती माजी सभापती सुरेश सावंत यांनी अनंत पवार यांचा धुव्वा उडवला. तर राष्ट्रवादीचे गुहागर तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावं लागलं.

दरम्यान, या पराभवाने आमदार भास्कर जाधव यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. खरंत तर गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांचं बरंच वर्चस्व आहे. मात्र, असं असतानाही या निवडणुकीतील त्यांच्या पॅनलचा पराभव हा त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.

    follow whatsapp