विनोद तावडेंची पुन्हा कमाल; तीन मुख्यमंत्र्यांना पाणी पाजत मारली बाजी!

मुंबई तक

18 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:15 AM)

Chandigarh Municipal Corporation : चंदीगड : सलग दुसऱ्या वर्षी बहुमत नसतानाही चंदीगढ महापालिकेत भाजपचा महापौर विजयी झाला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अनुप गुप्ता यांना १५ मत मिळाली तर आम आदमी पक्षाचे उमेदवार जसबीर सिंह यांना १४ मत मिळाली. केवळ एका मताने भाजपा महापौर इथून विजयी झाला आहे. या निवडणुकीचे प्रभारी म्हणून सलग दुसऱ्यांदा […]

Mumbaitak
follow google news

Chandigarh Municipal Corporation :

हे वाचलं का?

चंदीगड : सलग दुसऱ्या वर्षी बहुमत नसतानाही चंदीगढ महापालिकेत भाजपचा महापौर विजयी झाला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अनुप गुप्ता यांना १५ मत मिळाली तर आम आदमी पक्षाचे उमेदवार जसबीर सिंह यांना १४ मत मिळाली. केवळ एका मताने भाजपा महापौर इथून विजयी झाला आहे. या निवडणुकीचे प्रभारी म्हणून सलग दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. (bjp leader vinod tawde play-imp role-in-chandigarh-municipal-corporation-mayoral-elections-latest-news)

चंदीगडमध्ये भाजप आणि आम आदमी पक्षाचे प्रत्येकी १४ नगरसेवक आहेत, परंतु चंदीगडच्या खासदार किरण खेर यांचे एक मतही भाजपच्या उमेदवाराला मिळालं आणि अनुप गुप्ता यांचा विजय सोपा झाला. काँग्रेसचे ६ नगरसेवक आणि शिरोमणी अकाली दलाचे १ नगरसेवक या निवडणुकीवेळी अनुपस्थित राहिल्याचा थेट फायदा भाजपला झाला.

काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या अनुपस्थितीचा फायदा भाजपला कसा झाला हे समजून घेण्यासाठी आकड्यांचा खेळ समजून घेणं गरजेचं आहे.

चंदीगड महापालिकेत एकूण ३५ नगरसेवक आहेत. याशिवाय चंदीगडच्या खासदारांनाही इथं मतदानाचा अधिकार आहे. एका बाजूला आम आदमी पक्षाचे १४ नगरसेवक आणि भाजपचे १४ नगरसेवक आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे ६ नगरसेवक आणि शिरोमणी अकाली दलाकडे एक नगरसेवक आहे. समजा सर्व नगरसेवकांनी मतदान केलं असते तर बहुमताचा आकडा १९ झाला असता.

परंतु काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाने मतदान न केल्याने बहुमताचा आकडा १५ पर्यंत खाली आला. अशातच भाजप खासदार किरण खेर यांचे एक मत भाजपच्या उमेदवाराला मिळालं. त्यामुळे १५ मतांसह अनुप गुप्ता सहज विजयी झाले. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार जसबीर सिंह यांना १४ मत मिळाली. एका मताने त्यांचा पराभव झाला.

चंदीगड महापालिकेतील महापौर निवडणुकीत थेट आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लक्ष घातलं होतं. मतदानावेळी फोडीची शक्यता लक्षात घेऊन आम आदमी पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिल्लीत हलवण्यात आले होते. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. तर काँग्रेसने त्यांच्या ६ नगरसेवकांना काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेशला पाठवलं होतं.

    follow whatsapp