मुंबई: शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) हे दोन्ही पक्ष खरे तर एकेकाळचे सख्खे मित्र. पण आज हे दोन्ही पक्ष एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेलं सत्तानाट्य आणि सत्तेच्या खुर्ची पटकावणारा शिवसेना पक्ष हा आजच्या घडीला भाजपचा क्रमांक एकचा राजकीय शत्रू बनला आहे. पण अशा सगळ्या घडामोडींमध्ये आज एक फारच वेगळी गोष्ट पाहायला मिळाली आहे. ती म्हणजे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या (Saamana) संपादकीय पानावर चक्क भाजप नेत्याचा लेख छापून आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. जाणून घेऊयात नेमकं काय हे संपूर्ण प्रकरण:
ADVERTISEMENT
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनचीच परिस्थिती आहे. त्यात सुरुवातीला अनेक ठिकाणी ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवला. तर दुसरीकडे लसीकरण मोहीम देखील काही प्रमाणात बारगळली असल्याचंच दिसून येत आहे. अशावेळी आता विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. त्यामुळेच विरोधकांच्या याच आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांचा थेट ‘सामना’च्या संपादकीयमधून लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
‘सामना’त अग्रलेख आला म्हणजे घाव वर्मी बसलाय, फडणवीसांचा सेनेवर वार
सर्वात आधी आपण जाणून घेऊयात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या लेखातून विरोधकांना नेमकं काय उत्तर दिलं आहे:
‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता हळूहळू कमी होते आहे. आणखी पंधरा-वीस दिवसांत परिस्थिती आणखी आटोक्यात येईल, अशी चिन्हे आहेत. पण या निमित्ताने येनकेन प्रकारेण मोदी सरकारला टीका करत रहाणे हेच काहीजणांचे सध्या प्रमुख कार्य झाले आहे. दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने मोदी सरकारला घेरण्याची नेपथ्यरचना देशातील आणि देशाबाहेरील मोदी विरोधकांनी केली. त्याआधी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोठा हिंसाचार घडवून त्याद्वारे मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे मनसुबे असफल झाल्यानंतर या मंडळींनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे निमित्त शोधले आणि विदेशातील बड्या वृत्तपत्रांतून, साप्ताहिकांतून आपले दिवे पाजळत मोदी सरकारला दोषी ठरवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरु केले.’ असं केशव उपाध्ये यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
केशव उपाध्ये यांनी संपूर्ण लेखात मोदी सरकारने कोरोना काळात केलेल्या कामाचा पाढाच वाचला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसवर बोचऱ्या शब्दात टीकाही केली आहे.
या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेने आपल्या मुखपत्रात थेट भाजप प्रवक्त्याला टीकात्मक लेख लिहण्याची परवानगी दिल्याने आता राजकारण नेमकं कोणत्या दिशेले जात आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. खरं तर राज्यात शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. अशावेळी शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर टीका करणारा लेख नेमका प्रसिद्ध केलाच कसा? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
‘आघाडी सरकार सापाला दूध पाजतंय’, ‘सामना’तून सरकारला कानपिचक्या
गेल्या अनेक दिवसांपासून ‘सामना’तून काँग्रेस उधळली जात होती स्तुतीसुमनं
राज्यात काँग्रेसच्या साथीने शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक दिवस सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर स्तुती सुमनं उधळली जात होती. यावेळी अगदी स्वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेसचं महत्त्व हे अधोरेखित केलं जात होतं. तर याचवेळी दुसरीकडे भाजपवर टीकेचे बाणही सोडले जात होते. अशावेळी आता भाजपच्या एका नेत्याने मोदी सरकारचा बचाव करताना काँग्रेसवर टीका केली आणि याबाबतचा लेख आता थेट ‘सामना’तून प्रसिद्ध करण्यात आल्याने प्रचंड आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
‘सामना वृत्तपत्राकडे दुर्लक्ष करा’
2014 साली भाजप सत्तेत आल्यावर आणि शिवसेना सत्तेत भागीदार असताना देखील सामनातून सातत्याने भाजपवर टीका केली जात होती. तेव्हापासून भाजपचे नेते हे ‘सामना’मधील अग्रलेखांकडे दुर्लक्ष करा असं सातत्याने सांगायचे. 2019 च्या निवडणुकीनंतर तर सामना हे दखल घेण्याजोगे वृत्तपत्र देखील नाही असं भाजपचे नेते उघडपणे बोलत होते. असं असताना आता भाजपच्याच एका प्रवक्त्याने थेट सामनामध्ये लेख कसा लिहला? असा सवालही उपस्थित केला जता आहे.
‘ममतादीदींचा हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक’, शिवसेनेचा खोचक अग्रलेख
सत्तेसाठी राजकारण हे कोणत्याही थराला जाऊ शकतं हे 2019 च्या निवडणुकीनंतर अवघ्या देशाला पाहायला मिळालं होतं. त्यामुळे राजकारणात कधीही कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो. त्यामुळेच आता सामनातील या लेखाने काही नव्या राजकीय समीकरणांचे तर संकेत दिले जात नाहीएत ना? असा सवाल अनेक जण विचारत आहेत.
ADVERTISEMENT