पवारांनो वेळीच सुधारा, नाहीतर…: गोपीचंद पडळकरांचा गर्भित इशारा

मुंबई तक

19 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:55 AM)

अभिनेत्री केतकी चितळेने फेसबूकवर शरद पवार यांच्याविषयी लिहीलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी यात केतकी चितळेच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे. परंतू भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशाही परिस्थितीत पवार कुटुंबाला गर्भित इशारा दिला आहे. श्रीलंकेत घराणेशाहीला कंटाळून लोकांनी उद्रेक केला तसच पवारांच्या घराणेशाहीच्या विरोधात एक दिवस लोकं […]

Mumbaitak
follow google news

अभिनेत्री केतकी चितळेने फेसबूकवर शरद पवार यांच्याविषयी लिहीलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी यात केतकी चितळेच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे. परंतू भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अशाही परिस्थितीत पवार कुटुंबाला गर्भित इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

श्रीलंकेत घराणेशाहीला कंटाळून लोकांनी उद्रेक केला तसच पवारांच्या घराणेशाहीच्या विरोधात एक दिवस लोकं रस्त्यावर उतरतील. त्यामुळे पवारांनी वेळेत सुधारावं असं गोपीचंद पडळकर म्हणाले, ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

पवार घराण्याला महाराष्ट्राच्या संस्कारांवर आणि संस्कृतीवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. तुम्ही आता त्या संस्कृतीचे राहिले नाहीत. पवारांनी तर संस्कार आणि संस्कृतीबद्दल बोलूच नये, पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल. श्रीलंकेत घराणेशाहीला कंटाळून लोकांनी रस्त्यावर उद्रेक केला. तसाच उद्रेक पवारांच्या घराणेशाहीविरोधात लोकं करतील त्यामुळे पवारांनी वेळीच सुधारावं असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. परंतू पोलीस कारवाई करताना आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करत असल्याचंही पडळकर म्हणाले. यावेळी पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही पवारांवर आगपाखड केली.

ओबीसी आरक्षणाची हत्या पवारांनीच केली. आपल्या जवळील प्रस्थापितांना सत्तेत वाटा मिळावा यासाठी पवारांची धडपड सुरु असते. यासाठीच त्यांना आरक्षण द्यायचं नसल्याचा आरोप पडळकरांनी केला.

    follow whatsapp