भाजपची दोन मतं महाविकास आघाडीला पडणार; मिटकरींच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई तक

• 11:35 AM • 19 Jun 2022

अकोला: विधान परिषद निवडणुकीला (Vidhan Parishad Election) काही तास उरलेले असतानाच नेत्यांच्या वक्तव्याने खळबळ उडत आहे. उद्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. आपले आमदार फुटू नये म्हणून प्रत्येक पक्षाने विशेष काळजी घेतली आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राज्यसभा निवडणुकीत आपली मतं फुटली अशी शंका असल्याने विधान परिषद निवडणुकीत पक्ष आमदारांवरती […]

Mumbaitak
follow google news

अकोला: विधान परिषद निवडणुकीला (Vidhan Parishad Election) काही तास उरलेले असतानाच नेत्यांच्या वक्तव्याने खळबळ उडत आहे. उद्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. आपले आमदार फुटू नये म्हणून प्रत्येक पक्षाने विशेष काळजी घेतली आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.

हे वाचलं का?

राज्यसभा निवडणुकीत आपली मतं फुटली अशी शंका असल्याने विधान परिषद निवडणुकीत पक्ष आमदारांवरती करडी नजर ठेऊन आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या वक्तव्यांनी खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे दोन आमदार महाविकास आघाडीला मतदान करतील आणि आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला आहे.

अमोल मिटकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीला चारीमुंड्या चित करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. काही आमदारांच्या तक्रारी असतीलही त्यांची सर्वांची समजूत काढली जाईल. विधान परिषदेची ही निवडणूक महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी उद्या एकत्र लढणार आहेत, त्यामुळे आघाडीचा विजय नक्की होईल. उलट भाजपची दोन मतं आघाडीला पडतील आणि विजय आमचाच होईल. उद्या चार वाजेपर्यंत वाट पाहावी.

दरम्यान राज्यसभेला आमची मतं फुटली असा आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी करत थेट आमदारांची नावं घेतली होती. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची मतं या निवडणुकीत महत्त्वाची ठरली होती. आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे एक-एक मत या निवडणुकीत मोलाचं आहे. ही निवडणूक भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात आहे. भाईंना आठ मतांची तर प्रसाद लाड यांना २२ मतांची गरज आहे.

विधान परिषदेला उभे असलेले उमेदवार

भाजप

उमा खापरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड

शिवसेना

आमश्या पाडवी, सचिन अहिर

राष्ट्रवादी काँग्रेस

रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

काँग्रेस

चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप

    follow whatsapp