गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. एबीपी अस्मिता या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. १ ते ५ डिसेंबर या कालावधीत गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. यावेळी अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत अमित शाह?
गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करेल याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही. अनेक संस्थांनी जो सर्व्हे केला आहे त्यामध्ये भाजपला १३१ ते १३९ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र गुजरातच्या लोकांमध्ये, तरूणांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचं वातारवण आहे. त्यामुळे सगळे रेकॉर्ड मोडून आम्ही सरकार स्थापन करू असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी समान नागरी कायदा लागू होऊ शकतो. याबाबत विचारलं असता अमित शाह म्हणाले की गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करणं हे जनसंघाच्या स्थापनेपासूनच आमच्या अजेंड्याचा भाग आहे. समान नागरी कायदा ही भाजपची देशातल्या जनतेशी असलेली बांधिलकी आहे. मात्र काँग्रेसकडून पहिल्यापासूनच या गोष्टीला विरोध दर्शवला आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
समान नागरी कायद्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्माच्या आधारावर कोणताही कायदा नसावा. कलम 14 आणि कलम 15 दोन्ही स्पष्ट करतात की कोणत्याही व्यक्तीला समान वागणूक दिली पाहिजे. धर्माच्या आधारावर कुणालाही विशेष वागणूक मिळू नये, कुणावर अन्याय होऊ नये.
बूथ कार्यकर्त्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि निष्ठेने सरकार चालवताना केलेल्या चांगल्या कामाचे फळ भाजपला मिळेल. त्यामुळे प्रचंड बहुमताने जुना विक्रम मोडीत काढत भारतीय जनता पक्ष 2022 च्या निवडणुका पुन्हा जिंकेल. आम आमदी पक्षाकडून गुजरातमध्ये मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. परंतु, 1960 पासून गुजरातमध्ये शिक्षण मोफत आहे. ज्याप्रकारे गुजरातमध्ये विकास झाला आहे, गुजरातमध्ये तुम्हाला ज्या प्रकारचे निकाल मिळाले आहेत, देशातील गुजरात सोडा, 370 ची कलम नरेंद्र मोदी इतक्या खंबीरपणे उखडून टाकतील याची कल्पनाही देशात कोणीही करू शकत नाही, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT