MPSC च्या परीक्षेत भाजपचा प्रचार, यशोमती ठाकूर यांचा आरोप

मुंबई तक

• 02:09 PM • 30 Mar 2021

MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजप धार्जिणा प्रचार करण्यात आल्याचा आरोप आता यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भाजप धार्जिणा प्रचार आणि काँग्रेस विरोधी भूमिका रूजवण्याचा प्रयत्न झाल्याचंही यशोमती ठाकूर यांनी पत्रात म्हटलं आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांनी कुणी भडकवतंय म्हणून […]

Mumbaitak
follow google news

MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजप धार्जिणा प्रचार करण्यात आल्याचा आरोप आता यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भाजप धार्जिणा प्रचार आणि काँग्रेस विरोधी भूमिका रूजवण्याचा प्रयत्न झाल्याचंही यशोमती ठाकूर यांनी पत्रात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

MPSC च्या विद्यार्थ्यांनी कुणी भडकवतंय म्हणून भडकू नये-उद्धव ठाकरे

MPSC च्या परीक्षेत वाद निर्माण करण्यात आला तोही जाणीवपूर्वक करण्यात आला असाही आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. परीक्षेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख न करता मोदी सरकार असा उल्लेख असलेला उतारा प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे असंही या पत्रात यशोमती ठाकूर यांनी नमूद केलं आहे. काँग्रेसने ब्रिटिश शिक्षणपद्धती निवडली असा तथ्यहीन आरोपही या प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. असा उतारा या प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करण्यामागील हेतू हा काँग्रेसची बदनामी होता हे स्पष्ट होते आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. मागील परीक्षेत मनुस्मृतीबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.

संघ विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रूजवण्यात येतो आहे अशीही आमची भावना आहे. या राजकीयीकरणाला अभ्यासक्रमापासून दूर ठेवण्याची गरज आहे तसेच अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणंही आवश्यक आहे असंही यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

    follow whatsapp