कळंबोली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात विकृत पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलंच महागात पडलं आहे. केतकीच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे समर्थक हे प्रचंड संतापले असून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केतकी चितळे हिच्यावर काळी शाई फेकून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी केतकीला धक्काबुक्की देखील झाली.
ADVERTISEMENT
केतकीने शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विकृत पोस्टनंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी तिच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारही नोंदवली आहे. त्यातच केतकीला पोलीस कळंबोलीहून कळवा पोलीस ठाण्यात नेत असताना तिच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अचानक शाई फेक आणि अंडी फेकली. यावेळी केतकीला मारहाण करण्याचा देखील प्रयत्न झाला.
कळंबोली पोलीस स्टेशनबाहेर केतकीसोबत काय घडलं?
या प्रकरणात सुरुवातीला केतकीला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी पोलिसांनी इथे तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर कळवा पोलीस हे कळंबोली पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर त्यांनी केतकीला आपल्या ताब्यात घेतलं आणि ते तिला कळव्याला घेऊन निघाले.
मात्र, केतकी कळंबोली पोलीस स्टेशन बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्या विरोधात तुफान घोषणाबाजी सुरु केली. यातच काही जणांनी तिच्यावर अंडी फेकली याशिवाय त्यांनी तिच्यावर काळी शाई देखील फेकली. तसंच तिला धक्काबुक्की करण्यात आली. या सगळ्या धक्काबुक्कीत केतकी ही खाली देखील पडली.
मात्र, यावेळी पोलिसांनी तात्काळ कडं करत केतकीला आपल्या गाडीत बसवलं आणि आंदोलकांना मागे सारलं. त्यानंतर पोलिसांची गाडी ही वेगाने निघून गेली.
अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी विकृत पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कळंबोलीतून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर तिला कळवा या ठिकाणी आणलं जाणार आहे.
शुक्रवारी रात्री केतकी चितळेने एक फेसबुक पोस्ट केली. या पोस्टमध्ये शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केली. त्यानंतर आता केतकी चितळेवर पोलिसांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतलं आहे.
अभिनेत्री केतकी चितळेची विकृत पोस्ट, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
केतकीने पोस्ट केलेली पोस्ट
“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)
ही कविता केतकीने पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. तसंच गुन्हाही दाखल झाला. आता पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT