Omicron चा प्रसार मुंबईत होऊ न देण्यासाठी BMC सज्ज, वॉर रुम अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी

मुस्तफा शेख

• 09:30 AM • 04 Dec 2021

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत ओमिक्रॉनचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिकेने एक योजना आखली असून ज्यात बाहेरील देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे. बाहेरुन आलेल्या नागरिकांना घरात क्वारंटाइन होण्यासाठीचे नियम महापालिकेने याआधीच जाहीर केले आहेत. या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी Ward war room वर सोपवण्यात […]

Mumbaitak
follow google news

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत ओमिक्रॉनचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिकेने एक योजना आखली असून ज्यात बाहेरील देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे. बाहेरुन आलेल्या नागरिकांना घरात क्वारंटाइन होण्यासाठीचे नियम महापालिकेने याआधीच जाहीर केले आहेत. या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी Ward war room वर सोपवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या देशांतून आलेल्या नागरिकांना दिवसांतून पाच वेळा फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची जबाबदारी या वॉर रुमकडे सोपवण्यात आली आहे.

याचसोबत मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांना बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांची यादी सकाळी ९ वाजेपर्यंत BMC कडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एअरपोर्टकडून ही यादी आल्यानंतर ती वॉर रुमकडे देण्यात येईल ज्यानंतर वॉर रुमचे अधिकारी या प्रवाशांसोबत संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतील. याचसोबत बाहेरुन आलेल्या प्रवाशांनी सातव्या दिवशी RTPCR चाचणी केली की नाही याकडेही वॉर रुमचे अधिकारी लक्ष ठेवणार आहेत.

Omicron Variant : कोरोना होऊन गेलेल्यांनाही ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो?

तसेच बाहेरील देशांतून आलेले प्रवासी ज्या सोसायटीत राहणार आहेत त्या सोसायटीच्या कमिटी मेंबर्सना याविषयी माहिती देण्यात येईल. तसेच होम क्वारंटाइनच्या नियमांमध्ये भंग झाल्यास या प्रवाशांवर कारवाई केली जाणार असल्याचं BMC ने स्पष्ट केलंय.

मुंबई महापालिकेने बाहेरील देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी होम क्वारंटाइनचं अत्यंत कडक रुपरेखा बनवली आहे. हे प्रवासी मुंबईत आल्यापासूनच त्यांच्या क्वारंटाइनल प्रोजिसरला सुरुवात होईल. मुंबईत ओमिक्रॉनचा प्रसार न होऊ देणं हे आमचं प्रमुख उद्दीष्ट असल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं.

अमरावती : Omicron च्या तपासणीसाठी तेरा नमुने दिल्लीला पाठवले

    follow whatsapp