भारदस्त आवाज आणि तेवढाच भारदस्त खलनायक साकारणारे सलीम घोष यांचं आज निधन झालं आहे. मंथन, चक्र, कलयुग, सारांश, त्रिकाल, आघात, द्रोही, मोहन जोशी हाजीर हो, सरदारी बेगम, कोयला, सोल्जर अशा अनेक सिनेमांमधून आपल्या कामांची छाप उमटवणारे सलीम घोष यांचं निधन झालं आहे. सलीम घोष यांच्या पत्नीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
घोष यांनी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेमात कामं केली आहेत. तसंच टेलिव्हिजनवरच्या मालिकांमध्ये त्यांनी खलनायक म्हणून काम केलं आहे. अभिनेता विवान शाह यांनी सलीम घोष यांच्या निधनाचं वृत्त ट्विटरवरून शेअर केलं आहे.
१९७८ मध्ये सलीम यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. मंथन, चक्र, कलयुग, सारांश, त्रिकाल आघात, द्रोही, मोहन जोशी हाजिर हो, सरदारी बेगम, कोयला, सोल्जर या हिट चित्रपटांमधील सलीम यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ये जो है जिंदगी, सुबह, भारत एक खोज आणि संविधान या मालिकांमध्ये सलीम यांनी काम केलंय.
सलीम घोष यांनी पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्युट ऑफ इंडिया (FTII) मधून ग्रॅज्युएशन केलं होतं. सलीम घोष य़ांनी द परफेक्ट मर्डर, किम, द महाराजास डॉटर यांसारखे काही ड्रामाही केले. १९९५ ला रिलिज झालेल्या लॉयन किंगच्या हिंदी व्हर्जनसाठी त्यांनी स्कार या पात्राला आवाजही दिला होता.
भारत एक खोज या हिंदी मालिकेत सलीम घोष यांनी विविध भूमिका केल्या होत्या. त्यातली त्यांची कृष्णाची भूमिका विशेष गाजली. शांती प्रस्ताव घेऊन आलेला कृष्ण आणि गांधारीने कुरूक्षेत्रावर आक्रोश केल्यानंतर प्रकट झालेला कृष्ण आणि तिचा शाप मुलगा म्हणून झेलणारा कृष्ण त्यांनी ज्या ताकदीने साकारला त्याला तोड नाही.
सलीम घोष यांनी विविध भूमिका केल्या होत्या. त्यांचा भारदस्त आवाज आणि त्यांच्या डोळ्यांमधून बोलणारी भेदक नजर ही बॉलिवूड कधीही विसरणार नाही. आज वयाच्या ७० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.
ADVERTISEMENT