मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि तिच्या कुटुंबीयांवर आज (30 जून) अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण मंदिरा बेदीचा पती (Husband) राज कौशल (Raj Kaushal) यांचं बुधवारी सकाळी वयाच्या 49व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन (dies) झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे.
ADVERTISEMENT
मंदिरा बेदी आणि तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. मंदिरा आणि राज यांना दोन मुले आहेत. राज कौशल याचा निधनाचं वृत्त समजताच सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि चाहते प्रचंड शोक व्यक्त करत आहेत.
चित्रपट निर्माता ओनिर यांनी निधनाच्या वृत्ताला दिला दुजोरा
चित्रपट दिग्दर्शक ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘खूप लवकर गेलात… आज सकाळी आम्ही चित्रपट निर्माता आणि राज कौशल यांना गमावले आहेत. अतिशय दु:खद… ते माझा पहिला सिनेमा माय ब्रदर निखिल या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होते. तो त्या लोकांपैकी एक होते ज्यांनी आमच्या दृश्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला पाठिंबा दिला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.’
राज कौशलची नेमकी कारकीर्द कशी होती?
राज कौशल हे व्यवसायाने दिग्दर्शक आणि निर्माता होते. राजने एक अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. नंतर तो दिग्दर्शन क्षेत्राकडे वळाला. राज कौशलने अँन्थोनी कौन है, शादी का लड्डू, प्यार में कभी कभी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय, माय ब्रदर… निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी कभी भी या चित्रपटाचा तो निर्माता देखील होता.
अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचे फेब्रुवारी 1999 मध्ये लग्न झाले होते. 19 जून 2011 रोजी मंदिराने मुलगा वीरला जन्म दिला होता. तर गेल्या वर्षी 2020 मध्ये मंदिरा बेदी आणि राज यांनी 4 वर्षाची मुलगी दत्तक घेतली होती. जिचे नाव तारा बेदी-कौशल असे आहे.
मंदिराच्या अभिनयातील करिअरमध्ये राजचं मोठं योगदान होतं. राज कौशलने कॉपी रायटर म्हणून जाहिरात क्षेत्रातून आपला प्रवास सुरू केला होता. त्यानंतर त्याने ‘त्रिमूर्ती’ चित्रपटात सहाय्यक म्हणून मुकुल आनंद यांच्यासोबत काम केलं होतं. ‘दिन में कभी कभी कभी’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला सिनेमा होता.
The Flying Sikh मिल्खा सिंग यांचं Corona मुळे निधन
यानंतर त्याने स्वत:ची प्रोडक्शन कंपनीही सुरु केली होती आणि बऱ्याच जाहिराती देखील बनवल्या. दरम्यान, त्याने फारशे चित्रपट नाही बनवले एकूण तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि निर्माता म्हणून फक्त तीन सिनेमे प्रदर्शित केले.
ADVERTISEMENT