ADVERTISEMENT
कोराना काळात दिग्गज सेलिब्रिटींच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला.
काहींचा कर्करोगाने तर, काहींचा कोरोनाच्या संसर्गामुळे आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अलीकडेच मंदिरा बेदीच पती निर्माता-दिग्दर्शक राज कौशलचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
बॉलिवूडमध्ये राज कौशल हा एकचं नाही तर, असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमावला.
बॉलिवूडमधील कपूर कुटुंबातील राजीव कपूर यांचंही 58 व्या वर्षी निधन झालं.
कोरिओग्राफर सरोज खान यांचाही 3 जुलै 2020 रोजी 71 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं.
सलमान खानबरोबर ‘वॉन्टेड’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता इंदर कुमारचा 43 व्या वर्षी झोपेतच निधन झालं.
शोले चित्रपटात झळकणारे प्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार यांचं 48 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं.
बॉलिवूडने अभिनेता विनोद मेहरा यांनाही अगदी कमी वयात (45 वर्षी) गमावलं.
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेते आणि गायक किशोर कुमार यांचंही अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
अभिनेते फारूख शेख ज्यावेळी कुटुंबासोबत दुबईत सुट्ट्यांसाठी गेले होते त्यावेळी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांचं वय 65 वर्ष होतं.
अभिनेते देवानंद हे आरोग्य तपासणीसाठी लंडनला गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
दिग्गज अभिनेत्री रीमा लागू शूटिंगनंतर घरी परतल्या त्यावेळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
अभिनेते ओम पूरी यांचं वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
ADVERTISEMENT