काँग्रेस नेते आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळात खासगी कामांसाठी सरकारी विमान वापरल्याचा आरोप भाजपने केला होता. या प्रकरणी भाजप नेते विश्वास पाठक यांच्या याचिकेला उत्तर द्या असं बॉम्बे हायकोर्टाने म्हटलं आहे. नितीन राऊत यांना 28 जुलैपर्यंत उत्तर देण्यास मुदत देण्यात आली आहे. नितीन राऊत यांनी विमान प्रवासासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केलेली रक्कम परत करावी अशी विनंतीही पाठक यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कुणालाही खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसांचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरणकडे मंत्र्याने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवास खर्चावर खर्च करण्यासाठी पैसा आहे
विश्वास पाठक, याचिकाकर्ते
विश्वास पाठक यांनी काय आरोप केला आहे?
मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कुणालाही खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसांचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरणकडे मंत्र्याने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवास खर्चावर खर्च करण्यासाठी पैसा आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सगळ्या नियमांचं उल्लंघन करून खासगी विमानातून सरकारी खर्चाने प्रवास केला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याने नितीन राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हटवावं अशीही मागणी विश्वास पाठक यांनी केली आहे. एवढंच नाही तर विश्वास पाठक यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशी देणारी कागदपत्रं आणि राऊत यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची प्रतही कोर्टात सादर केली.
सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 406, 409 अन्वये नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा अर्ज पाठक यांनी मार्च महिन्यात वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दिला होता. लॉकडाऊनच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 12 जून, 2 जुलै, 6 जुलै रोजी मुंबई-नागपूर, तर 9 जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर , दिल्ली असा चार्टर्ड फ्लाईटने प्रवास केल्याचे माहिती अधिकाराच्या अंतर्गत ‘महानिर्मिती’कडून समजल्याचा दावा पाठक यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आता या प्रकरणी नितीन राऊत यांनी 28 जुलैपर्यंत उत्तर द्यावं असं बॉम्बे हायकोर्टाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT