राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत आज सकाळी भेट झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाली. या भेटीचा तपशील कळू शकला नसला तरीही राज्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीकोनातून ही भेट महत्वाची मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी दिल्लीत चर्चेसाठी गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही नरेंद्र मोदींशी खासगीत चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर पवारांच्या या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.
ADVERTISEMENT
शरद पवारांनीही आपल्या ट्विटर हँडलवरुन या भेटीबद्दलची माहिती दिली असून विविध राष्ट्रीय प्रश्नांवर या भेटीत चर्चा झाल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारचं नवं सहकार खातं आणि बँकींग क्षेत्र या विषयावर चर्चा झाल्याचं कळतंय. परंतू याबद्दलचा अधिकृत तपशील पुढे आलेला नाही.
ADVERTISEMENT