ज़का खान, बुलडाणा: आजारपणाने भाऊ मयत झाल्यानंतर आपल्या विधवा भावजयसोबत विवाह करणारा तरुण सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील दिर आणि भावजयचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला.
ADVERTISEMENT
समाज काय म्हणेल याचा विचार न करता वानखेड येथे नुकताच विधवा भावजयीबरोबर लहान दिराने लग्नगाठ बांधली. यावेळी वऱ्हाडी मंडळींनीही मोठ्या दिलाने या अनोख्या विवाह सोहळ्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.
नंदा असं संबंधित महिलेचं नाव असून पतीचं निधन झाल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. एक मुलगा आणि लहान मुलगी यांची भविष्यात होणारी परवड पाहता नातेवाईक आणि मित्रांनी लहान दीर हरीदासला समजून सांगितले आणि हरीदासने देखील पुढे येत आपल्या वहिनीशी लग्न करण्याच निर्णय घेतला.
दोघांच्या होकारानंतर घरातील सर्वांची सहमती घेऊन त्यांचा विवाह पार पडला. समाजाचा कोणताही विचार न करता त्यांनी विवाह करत समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. हरिदास आणि नंदा या दोघांना पाहुणेमंडळी, वऱ्हाडीमंडळींनी आशिर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वानखेड गावातील दामदर कुटुंबीयांचे आज सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. एका तरुणानं मात्र समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत एका विधवा महिलेशी विवाह केला आहे. त्याने संबंधित महिलेला आयुष्यभराचा आधार दिला आहे. या अनोख्या लग्नामुळे संबंधित तरुणाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
13 वर्ष वयाने मोठ्या IAS अधिकाऱ्याशी लग्न करणार टीना डाबी, 2 वर्षातच मोडलं होतं पहिलं लग्न
तसेच या तरुणाच्या कुटुंबीयाने आणि समाजाने देखील त्यांच्या या लग्नाला मान्यता देऊन आपली प्रल्गभता दाखवून दिली आहे.
ADVERTISEMENT