लग्नाचं आमिष देत घटस्फोटीत बहिणीवर अत्याचार, धमकी देऊन केला गर्भपात; भावाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई तक

• 08:56 AM • 23 Feb 2022

– इसरार चिश्ती, औरंगाबाद प्रतिनिधी औरंगाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. आपल्याच नात्यातील घटस्फोटीत बहिणीला लग्नाचं आमिष दाखवत भावानेच तिच्यावर शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. इतकच नव्हे तर बहिण गर्भवती राहिल्याचं लक्षात येताच भावाने धमकी देऊन दिला गर्भपात करायला लावला. औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात या घटनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस […]

Mumbaitak
follow google news

– इसरार चिश्ती, औरंगाबाद प्रतिनिधी

हे वाचलं का?

औरंगाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. आपल्याच नात्यातील घटस्फोटीत बहिणीला लग्नाचं आमिष दाखवत भावानेच तिच्यावर शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. इतकच नव्हे तर बहिण गर्भवती राहिल्याचं लक्षात येताच भावाने धमकी देऊन दिला गर्भपात करायला लावला. औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात या घटनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे. पांडुरंग उर्फ राहुल ईप्पर असं या आरोपी भावाचं नाव असल्याचं कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊ आणि पीडित महिला हे दूरच्या नात्याने भाऊ-बहिण लागतात. पीडित महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर आरोपीने तिला मानसिक आधार देत मी तुझ्या मुलीचा आयुष्यभरासाठी सांभाळ करेन असं सांगत तिला लग्नाचं आश्वासन दिलं. इतकच नव्हे तर आरोपीने पीडित बहिणीच्या आई-वडीलांचा विश्वास संपादन केला. पीडित महिलेला पोटगीतून मिळालेल्या पैशांपैकी १ लाख ७५ हजार तर आईचे दागिने मोडून ५ लाख रुपये आरोपी उकळले.

चंद्रपूर : पतीपासून वेगळं राहत असलेली मुलगी राहिली गर्भवती; आईने सुपारी देऊन केली हत्या

या दरम्यान पीडित बहिणीला आरोपी राहुलकडून दिवस गेले. यावेळी राहुलने कायद्यानुसार आपले लग्न झाले नसल्याने तोपर्यंत गर्भ ठेऊ नको म्हणत तिला गोळ्या खाऊ घातल्या. तसेच आपल्या संबंधाबद्दल कोणाशी बोलशील तर तुझ्या मुलीला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत लग्न करण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.

Pune Crime : गुन्हे करुन त्याचा उपयोग करायचा कथा लेखनासाठी; लेखकाला सायबर पोलिसांनी केली अटक

सदर प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अमोल सोनवणे करत आहेत.

कोल्हापूर : घरगुती वादातून उच्चशिक्षीत मुलीने केला वडिलांचा खुन, स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

    follow whatsapp