पुण्याहून गोव्याकडे निघालेली बस जळून खाक, 37 प्रवासी बालंबाल बचावले

मुंबई तक

• 11:28 AM • 03 Feb 2022

सिंधुदुर्ग: पुण्याहून-गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतली ज्यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. ही घटना वैभववाडी तालुक्यातील एडगांव घाडीवाडी नजीक घडली. अचानक बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी तब्बल 37 प्रवासी बालबाल बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एक वयोवृद्ध महिला काही प्रमाणात जखमी झाली […]

Mumbaitak
follow google news

सिंधुदुर्ग: पुण्याहून-गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतली ज्यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. ही घटना वैभववाडी तालुक्यातील एडगांव घाडीवाडी नजीक घडली. अचानक बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी तब्बल 37 प्रवासी बालबाल बचावले आहेत.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, एक वयोवृद्ध महिला काही प्रमाणात जखमी झाली आहे. मात्र, इतर सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याचं समजतं आहे.

मनीष ट्रॅव्हल्सची GA 03/W 2518 क्रमांकाची ही बस गोव्याच्या दिशेने जात होती. पण करूळ घाट उतरल्यानंतर एडगांवनजीक बस आली असता बसने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ बस थांबवली. त्यांनी तात्काळ बसमधील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितलं. चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठी जीवितहानी टळली.

कारण प्रवासी बसमधून उतरताच आगीने रौद्र रुप धारण केलं आणि अवघ्या काही क्षणात संपूर्ण बसने पेट घेतला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वैभववाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्ग विभागाचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

भीषण अपघात : टँकरच्या धडकेनंतर बसला लागली आग; 12 जणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, काही तासाने कुडाळ येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व ही आग विझवण्यात आली. या घटनेनंतर एडगाव परिसरात वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळी सात वाजता अडकलेली वाहने अनेक तासानंतर मार्गस्थ करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा तपास आता वैभववाडी पोलीस करत आहेत.

    follow whatsapp