राज्यात विकेंड लॉकडाउनची घोषणा केल्यानंतरही वाढत्या रुग्णसंख्येत कसलाही फरक जाणवलेला नाही. याच कारणासाठी राज्य सरकार आता पुढील आठवड्यापासून संपूर्ण लॉकडाउन लावण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
ADVERTISEMENT
Weekend Lockdown: आज रात्री 8 वाजेपासून विकेंड लॉकडाऊन; पाहा काय सुरु, काय बंद
येत्या काही दिवसांमध्ये राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे सण येत आहेत. या सणांना होऊ शकणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकार पुढील आठवड्यात आणखी कडक निर्बंध लावून संपूर्ण लॉकडाउन लावण्याच्या विचारात आहे. राज्यातील कोरोना साखळी मोडण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं मत मंत्रीमंडळ बैठकीत समोर आलं. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याला २ ते ३ आठवड्यांसाठी कडक लॉकडाउनची गरज असल्याचं सांगितलं.
“राज्यात वाढत जात असलेली कोरोनाची रुग्णसंख्ये ही चिंताजनक आहे. काही दिवसांमध्येच महाराष्ट्रत सक्रीय रुग्णसंख्येचा आकडा १० लाखांच्या वर जाईल अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडायची असेल तर किमान दोन ते तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावणं गरजेचं आहे. याबाबत मी मंत्रीमंडळ बैठकीत बोललो आहे. ३-४ दिवसांमध्ये यावर सकारात्मक निर्णय होईल.” वडेट्टीवार यांनी पत्रकारांना माहिती दिली.
Break The Chain च्या नियमांमध्ये बदल, मुंबईत हॉटेल मालकांना Home Delivery ची परवानगी
भविष्यात लागू करण्यात येणारा संभाव्य लॉकडाउन हा कडक स्वरुपाचा असायला हवा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. या दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीत भाजीपाला आणि अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व गोष्टी बंद करुन लोकांनाही गरज असेल तरच घराबाहेर पडण्याची मुभा दिली जावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात लसीकरणाची बिकट परिस्थिती, एक दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक
सध्या राज्यात विकेंड लॉकडाउनची घोषणा असली तरीही भाजीपाला, किराणा दुकानांवर गर्दी होते आहे. हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला कडक लॉकडाउन लावावाच लागेल. या काळात आधीप्रमाणे ज्या पद्धतीने मोठ्या मैदानांवर भाजीपाला विकण्याची सोय करुन देण्यात येत होती, त्या पद्धतीने पुन्हा एकदा विचार करावा लागेल. किराणा मालाच्या दुकानातही आता घरपोच डिलेव्हरीसाठी नियम बनवण्याबद्दल विचार करावा लागेल असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे या बाबतीत राज्य सरकार आता काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT