पतीला आई-वडिलांपासून वेगळं करणं हा मानसिक छळ: कलकत्ता हायकोर्ट

मुंबई तक

10 Apr 2023 (अपडेटेड: 10 Apr 2023, 03:03 PM)

पतीला त्याच्या पालकांपासून दूर राहायला सांगणे हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे आणि कोणत्याही पतीला मानसिक छळाच्या आधारावर पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार आहे

husband has the right to divorce his wife on the ground of mental cruelty, Calcutta High Court

husband has the right to divorce his wife on the ground of mental cruelty, Calcutta High Court

follow google news

पतीला त्याच्या पालकांपासून दूर राहायला सांगणे हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे आणि कोणत्याही पतीला मानसिक छळाच्या आधारावर पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार आहे, असा निकाल देत कोलकाता उच्च न्यायालयाने एका घटस्फोट अर्जाला मंजुरी दिली आहे. (Any husband has the right to divorce his wife on the ground of mental cruelty, The Calcutta High Court)

हे वाचलं का?

कौंटुबिक न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाला एका महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या महिलेच्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला. महिलेने पतीवर आई-वडिलांना सोडण्यासाठी दबाव टाकला आणि पती-पत्नी दोघेही वेगळे राहू लागले, असा पतीचा दावा होता.

Dalai Lama video : चुंबन व्हिडीओचा वाद वाढला! दलाई लामांनी सोडलं मौन, म्हणाले…

उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळून लावताना अनेक महत्वाची निरीक्षण नोंदवली. न्यायालय म्हणाले, पतीला आई-वडील आणि कुटुंबापासून वेगळे करण्याचा प्रयत्न म्हणजे एक प्रकारचा मानसिक छळ आहे.पत्नीने मानसिक छळ केल्यास तसंच कोणतेही ठोस कारण न देता पतीला पालकांपासून दूर राहण्यास भाग पाडले, तर पतीला पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार आहे.आई-वडिलांचा सांभाळ करणे ही मुलाची जबाबदारी आहे. भारतात मुलगा लग्नानंतरही आई-वडिलांसोबत राहणे सामान्य गोष्ट आहे.

2009 पासून सुरू झाली कायदेशीर लढाई :

संबंधित पती-पत्नीची ही कायदेशीर लढाई 2009 पासून सुरू होती. दोघांनी 2001 मध्ये लग्न केले होते. मात्र काही दिवस गेल्यानंतर दोघांमध्येही कुरबुरी सुरु झाल्या. पती-पत्नीने कौंटुबिक न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार, पती व्यवसायाने शिक्षक होता आणि तो घर चालविण्यापुरतेही पैसे मिळवू शकत नव्हता, आपल्याच कुटुंबात कमावणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त होती, असा पत्नीने दावा केला होता.

Pune: मुलीने दिलेल्या नकारामुळे नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, पुण्यात नेमकं काय घडतंय?

तर पत्नी उघडपणे आपला अपमान करायची. आपल्याला भित्रा, नालायक आणि बेरोजगार म्हणत हिणवायची. कुटुंबात आपले आई-वडिलही राहतात. त्यामुळे आपण स्वतंत्ररित्या फ्लॅट भाड्याने घ्यावा, असा आग्रह धरत होती. त्याचदरम्यान, आपल्याला एकदा सरकारी नोकरीची संधी आली होती. मात्र पत्नीने कौंटुबिक छळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामुळे सरकारी नोकरी मिळू शकली नाही. या सगळ्या गोष्टींना वैतागून आपण स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला, असा दावाही पतीने केला होता. पतीचा हाच दावा मान्य करत पश्चिम मिदनापूर येथील कौटुंबिक न्यायालयाने पत्नीने अत्याचार केल्याच्या कारणावरून पतीला घटस्फोटाची परवानगी दिली होती.

    follow whatsapp