एकनाथ शिंदेंना स्वतःच्या हातून ट्विट तरी करता येतं का?- विनायक राऊत

मुंबई तक

• 08:19 AM • 06 Jul 2022

रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला…कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!” असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं होतं. उद्धव ठाकरेंना एकप्रकारे त्यांनी टोला लगावला होता. यावरून शिवसेना खासदार आणि सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Mumbaitak
follow google news

रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला…कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!” असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं होतं. उद्धव ठाकरेंना एकप्रकारे त्यांनी टोला लगावला होता. यावरून शिवसेना खासदार आणि सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.

हे वाचलं का?

‘एकनाथ शिंदे यांच्या विदवत्तेबद्दल संशोधन करावं लागेल, कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं, त्यांना स्वतःच्या हातून ट्विट तरी करता येतं का? याचा मला अभ्यास करावा लागेल, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यात विनायक राऊत यांनी टीका केली.

एकनाथ शिंदेंनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं की…

एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थीमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यावेळी मी ठाण्याचा संपर्कप्रमुख होतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते सतीश प्रधान यांना ए बी फॉर्म दिला होता, पण मी मध्यस्थी केली आणि एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा आमदारकीची उमेदवारी मिळाली. पण त्याचा आता मला पश्चाताप होतो आहे, आयुष्यातील मोठ पाप झालं आहे. मी सांगितलं नसतं तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती. त्यामुळे एकनाथ शिंदे पहिल्या वेळी आमदार कोणामुळे झाले हे त्यांनी आपल्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं असं राऊत यावेळी म्हणाले.

…म्हणून शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्राचा निर्णय घेतला आहे.

आम्हाला निवडणूक आयोगाला दाखवायचं आहे, की शिवसेनेची सदस्य संख्या किती आहे, आमची निष्ठा कोणाशी आहे यासाठी आम्ही शिवसैनिकांनी घेतलेला हा प्रतिज्ञापत्राचं निर्णय आहे. हा पक्षप्रमुखांचा आदेश नाही असेही विनायक राऊत म्हणाले आहेत. कारण शिंदे गट आता थेट शिवसेनेवरती आपला दावा ठोकत आहे. ज्या दिवशी उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्या दिवसापासून हे मुख्यमंत्री पद आपल्याला कसं मिळेल यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न केला असल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केला आहे.

दरम्यान काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!” अशा आशयाचं ट्विट केलं होतं. एकनाथ शिंदे आपल्यासोबत आमदारांना घेऊन जेव्हा गुवाहाटीत होते तेव्हा रिक्षावाला म्हणून त्यांना हिणवलं गेलं होतं. तसंच संजय राऊत यांनी त्यांच्याविषयी तसंच इतर आमदारांविषयी अपशब्द वापरले होते. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी हाच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महाविकास आघाडीचं सरकार गेलं. हे सरकार असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कायम बाहेर पडत असताना त्यांची मर्सिडिज कार घेऊन बाहेर पडत असत. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पूजेलाही ते कार चालवत गेले होते. त्याचाच संदर्भ घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला असावा.

    follow whatsapp