योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील सिव्हिल लाईन्स स्थित निवासस्थानी सीबीआयची कारवाई सुरू असतांना दोन अजून सीबीआयचे अधिकारी देशमुख यांच्या घरात दाखल झाले आहेत. एक महिला आणि पुरुष अधिकारी आत गेले त्यावेळी त्याच्या हातात एक लिफाफा होता. या लिफाफ्यात काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न असलेल्या एका संस्थेत आर्थिक अफरातफऱ झाल्याचं कळतं आहे. या दरम्यान 17 कोटींचं उत्पन्न लपवण्यात आलं आहे असंही समजतं आहे. 17 सप्टेंबरला याच कारणामुळे आयकर विभागानेही छापा मारला होता. आता सीबीआयच्या छाप्यात काय होणार हे अजून समोर यायचं आहे.
Money Laundering : अनिल देशमुख यांच्या पत्नीला ED चं समन्स
100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाले आहेत त्या प्रकरणी त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय यांच्याकडून चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनाही अटक केली. तसंच कुंदन शिंदे यांनाही अटक केली. मार्च महिन्यात जेव्हा परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलं त्यानंतर तीन दिवसात परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रूपये दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं. आता आज पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर छापे मारण्यात आले आहेत.
याआधी सीबीआयने या प्रकरणात देशमुख यांच्या निवासस्थानासह मुंबई पोलिसांकडून सहाय्यक आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांच्या निवासस्थानांसह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ईडी आणि सीबीआयने या प्रकरणी विविध व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत आणि तपास सुरू आहे. ईडीने त्यांना पाच समन्स बजावूनही देशमुख ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत.
निलंबित API सचिन वाझेने अनिल देशमुख यांना खंडणी म्हणून वसूल करण्यात आलेले 4.7 कोटी रूपये लाच म्हणून घेतले होते. सचिन वाझेंनी हे पैसे कुंदन शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर देशमुख आणि कुटुंबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या नागपूरच्या शैक्षणिक ट्रस्ट खात्यांच्या दिल्लीहून शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे पाठवण्यात आले असाही आरोप आहे. आता आजच्या छाप्यातून काय काय बाहेर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT