चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्याने त्यांच्याकडे असलेलं प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्या नेत्याला मिळणार हे स्पष्ट झालं होतं. अशात आता चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अगदी गुरूवारपर्यंत या चर्चा रंगल्या होत्या की चंद्रकांत पाटील यांच्या जागी आशिष शेलार प्रदेशाध्यक्ष होतील. मात्र आशिष शेलारांकडे मुंबई भाजपचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. आशिष शेलार हे आधीही मुंबईचे अध्यक्ष होते.
ADVERTISEMENT
चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव कसं आलं चर्चेत?
राज्यात शिंदे फडणवीस सरकार ३० जूनला स्थापन झालं. त्यानंतर सुमारे सव्वा महिना मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही. ९ ऑगस्टला अखेर भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ जणांनी शपथ घेतली. भाजपच्या ज्या नेत्यांनी शपथ घेतली त्यात चंद्रकांत पाटीलही होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडतील हे नक्की झालं. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाली आहे. त्यांच्या नावाची चर्चा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासूनच चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाची चर्चा होती,
चंद्रशेखर बावनकुळे गडकरींच्या गटातले नेते
आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या अनुशंगाने संघटन कौशल्य आणि अनुभवी अशा बावनकुळे यांचीच प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे नितीन गडकरी यांच्या जवळचे मानले जातात. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात शत्रुत्व नाही. पण बावनकुळे हे आपल्या मताने चालणारे नेते आहेत. आशिष शेलार यांचं नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत होतं. मात्र त्यांच्याऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांना हे पद मिळालं आहे. आशिष शेलार यांना मात्र मुंबई भाजपचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. विदर्भात त्यांच्या कामाचा असा वेगळा ठसा आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी चेहरा आहेत त्यामुळे भाजपबाबात ओबीसी समाजात वेगळी भावना निर्माण होणार नाही.
2014 ते 2019 या काळात बावनकुळे हे मंत्रि राहिलेले असताना देखील 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांची उमेगदवारी नाकारण्यात आली होती. असे असताना देखील त्यांनी पक्ष देईल जाबाबदारी घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्याचाच फायदा त्यांना याठिकाणी झाला आहे.
ADVERTISEMENT