पुणे मेट्रोचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळाल्या. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर पिंपरी-चिंचवड येथे चप्पल फेकून मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
शाहूनगर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या उद्यानाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे. या उद्यानाचा उद्घाटन सोहळा फडणवीसांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा या कार्यक्रमाला विरोध होता. ज्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी फडणवीसांचा ताफा दाखल झाला असता त्या ताफ्यावर चप्पल फेकून मारण्यात आल्यामुळे हे वातावरण आणखीनच चिघळलं.
यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. परंतू ताफ्यावर चप्पल फेकून मारण्यात आल्यानंतर पोलीसांच्या सुरक्षेत स्थानिक आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
कोथरूडमधली मुलं रविवारीही शाळेत जातात का? मोदींच्या पुणे दौऱ्यानंतर सुरू झालं ट्रोलिंग
ADVERTISEMENT