हर हर महादेव : …तर आयुष्यभर ऐतिहासिक चित्रपटांना विरोध करणार नाही; संभाजीराजे भडकले

मुंबई तक

18 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:34 AM)

हर हर महादेव चित्रपट आज टिव्हीवर प्रदर्शित होणार असून, यावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्याचबरोबर सिनेमॅटिक लिबर्टीच्या मुद्द्यावरून निर्माते-दिग्दर्शकांना सवालही केलेत. संभाजीराजेंनी नेत्यांच्या मौनावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “इतिहासाची मोडतोड करून जर चित्रपट दाखवत असाल, त्याला माझा […]

Mumbaitak
follow google news

हर हर महादेव चित्रपट आज टिव्हीवर प्रदर्शित होणार असून, यावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्याचबरोबर सिनेमॅटिक लिबर्टीच्या मुद्द्यावरून निर्माते-दिग्दर्शकांना सवालही केलेत. संभाजीराजेंनी नेत्यांच्या मौनावर नाराजी व्यक्त केली.

हे वाचलं का?

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “इतिहासाची मोडतोड करून जर चित्रपट दाखवत असाल, त्याला माझा वैयक्तिक विरोध असणार आहे. त्याला सर्व शिवभक्तांचा विरोध आहे. ऐतिहासिक चित्रपट यायलाच हवेत, त्याबद्दल दुमत नाहीये. सिनेमॅटिक लिबर्टीचा फायदा घेऊन अनेक चित्रपट असे समोर येताहेत, जे मोडतोड केल्याचं सिद्ध होतं.”

पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “माझा प्रामाणिक भावना आहे. नवीन पिढीला जो इतिहास दाखवला जातो, ती पिढी हाच इतिहास घेऊन पुढे जाणार आहेत. दुर्वैवाने नवी पिढी पुस्तक वाचत नाही. वाचन कमी झालेलं आहे. त्यामुळे चित्रपटातून जे दाखवलं जातं, तेच खरं मानलं जातं. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली प्रामुख्याने हर हर महादेव जो चित्रपट निघालाय, त्यांनी काय सांगितलं की, आम्हाला सेन्सॉर बोर्डाच्या सगळ्या परवानग्या आहेत.”

‘हर हर महादेव’ विरोधाची धार तीव्र; बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचाही आक्षेप

“आता सेन्सॉर बोर्ड दिल्लीत आहे. कुठले इतिहासकार आहेत, मला कल्पना नाही. माझी सरकारला आवाहन आहे की, राज्याची इतिहासकारांची समिती नेमणं गरजेचं आहे. पहिलं स्क्रीनिंग महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे आणि पुढचं स्क्रीनिंग दिल्लीत जाऊद्या”, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केलीये.

“हर हर महादेव चित्रपटातील तीन चार मुद्दे काढले आहेत. मी स्वतः तो चित्रपट बघितलेला नाही, कारण मला सांगितलं की, बघू नका इतकी इतिहासाची मोडतोड केलीये. मी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी मला सविस्तरपणे याची माहिती दिलीये,” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

हर हर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातो आहे? नेमका वाद आहे तरी काय?

हर हर महादेव चित्रपट वाद : छत्रपती संभाजीराजेंचे निर्माता, दिग्दर्शकाला सवाल

“जेधे-देशमुख आणि बांदल-देशमुखांचा वाद यात दाखवला आहे. जो वाद केव्हाच नाहीये. उलट ही शिवाजी महाराजांची ताकद आहे. वाद कशावर दाखवलाय, तर बकऱ्यावर. ज्या मोठ्या घराण्यांनी आपलं आयुष्य दिलं. तुम्ही त्यांचे वाद असे दाखवत आहात? हेच नवीन पिढीने घ्यायचं का?” असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केलाय.

“बाजीप्रभू देशपांडे हे देशमुखांचे सेवक होते. एक मोठा लढवय्या होता म्हणून बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्याबद्दल कुणी पुरावे मागत नाही. पण बाजीप्रभू देशपांडेंची लढाई ही शिवाजी महाराजांच्याविरुद्ध झाली. हा कुठला इतिहास आहे आणि कुठे लिहिलंय?” असं संभाजीराजे म्हणाले.

“पाटील हा बलात्कारी दाखवला आहे. हा कुठे लिहिलेला इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या पुढे जाऊन पाटील म्हणतो की मी 50 नाही तर 60 बलात्कार केले आहेत. हा इतिहास नवीन पिढीने पाहायचा आहे का?” अशा शब्दात संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला आहे.

हर हर महादेव वाद : जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, अभिजित देशपांडेंनी सांगितले पुस्तकाचं नाव

‘शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा बाजार’; हर हर महादेव मधील दृश्यावरून छत्रपती संभाजीराजेंनी केला सवाल

“कृष्णाजी बांदल, बाजी बांदल, रायजी बांदल, कानोजी नाईक, जेधे देशमुख, दीपा बांदल या लोकांनी स्वराज्य उभं केलंय. शिवाजी महाराजांकडे असे सेनापती, असे मावळे नसते तर शिवाजी महाराज स्वराज्य निर्माणच करू शकले नसते. आणि आपण यांच्या भांडणं लावतोय.”

“शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महत्त्वाचा घटक होता, स्त्रियांना सन्मान देणं. या हर हर महादेव मध्ये स्त्रियांचा बाजार लावलेला आहे. हे बरोबर आहे का? हे शोभतंय का? ही शिवाजी महाराजांची संस्कृती आहे का? शिवाजी महाराजांच्या कालखंडात मावळ मध्ये स्त्रियांचा बाजार भरायचा, हे नव्या पिढीला सांगायचं. हे कोण खपवून घेणार. कुठल्या इतिहासकाराने सांगावं की शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा बाजार भरत होता. कुठल्या इतिहासात लिहिलंय? शिवभारतमध्ये लिहिलंय का?”, असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला.

“आताचा कुठल्या नेता, पुढाऱ्याने सांगावं. शिवाजी महाराजांचा समाजकारणासाठी, राजकारणासाठी वापर करा, पण सांगा की शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा बाजार भरायचा. हे दाखवायचं हर हर महादेव मध्ये,” असं संभाजीराजे म्हणाले.

हर हर महादेव चित्रपटाला विरोध करणं थांबवेन- छत्रपती संभाजीराजे

“माझा विरोध निर्माता किंवा दिग्दर्शकाला नाहीये. कुणी काढलाय, त्यालाही माझा विरोध नाहीये. ऐतिहासिक मोडतोड करून चित्रपट काढणं चुकीचं आहे. माझं सगळ्या नेत्यांना माझं म्हणणं आहे की, त्यांनी सांगावं हर हर महादेव मध्ये जे दाखवलं आहे ते 100 टक्के सत्य आहे. तर मी लगेच हर हर महादेवचा विरोध करणं थांबवेन. मी एकटा का विरोध करू. सगळ्या इतिहासकारांनी आज बोलावं,” अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

“हर हर महादेव चित्रपट बरोबर आहे, असं सांगावं मी एकही पत्रकार परिषद याबद्दल घेणार नाही. ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीत आयुष्यभर पत्रकार परिषद घेणार नाही. तुम्हाला वाटत असेल की, वशंज चुकीचं सांगतोय, तर सांगा. मी नाही बोलणार यापुढे. स्वराज्यच्या लोकांनी विरोध केला. त्यांना फरफट नेलं. ते दरोडेखोर आहेत का?” असं छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले.

    follow whatsapp