शिवजयंती विशेष : …तर कदाचित महाराजांची भवानी तलवार आज महाराष्ट्रात असती

मुंबई तक

• 02:11 AM • 19 Feb 2022

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने महाराजांच्या कार्य कर्तृत्वाला, महाराजांविषयीच्या किस्से आणि कहाण्यांना उजाळा दिला जात आहे. यात एक किस्सा नेहमी ऐकायला मिळतो, तो भवानी तलवारीचा! ब्रिटनमध्ये असलेली ही तलवार आणण्यासाठी महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते. त्यांची ब्रिटनच्या महाराणीशी बैठक ठरली होती. मात्र, ती बैठक झालीच नाही. […]

Mumbaitak
follow google news

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने महाराजांच्या कार्य कर्तृत्वाला, महाराजांविषयीच्या किस्से आणि कहाण्यांना उजाळा दिला जात आहे. यात एक किस्सा नेहमी ऐकायला मिळतो, तो भवानी तलवारीचा! ब्रिटनमध्ये असलेली ही तलवार आणण्यासाठी महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते. त्यांची ब्रिटनच्या महाराणीशी बैठक ठरली होती. मात्र, ती बैठक झालीच नाही. भवानी तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करणारे हे मुख्यमंत्री होते ए.आर. अंतुले!

हे वाचलं का?

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार बरखास्त करण्यात आलं आणि महाराष्ट्राला पहिले मुस्लीम मुख्यमंत्री मिळाले. त्यांचं नाव होतं ए.आर. अंतुले. अंतुले यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली, त्यांच्या शिवप्रेमाचे किस्से आजही चर्चिले जातात. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य सामान्यपर्यंत पोहोचावं म्हणून काही महत्त्वाचं काम केलं. कुलाबाच्या नामांतरापासून ते शिवाजी महाराजांची इंग्लडमध्ये असलेली भवानी तलवार परत आणण्यासाठी धडपड केली.

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ब्रिटनमध्ये आहे. ही तलवार परत आणण्यासाठी अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात धडपड केली होती. तलवार परत आणण्यासाठी त्यांनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलणी सुरू केली होती. त्यांची बैठकही ठरली होती. पण, या बैठकीच्या आधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर बसलेले बाबासाहेब भोसले हे राणीशी चर्चा करण्यासाठी गेलेच नाही. ही चर्चा पुढे गेली असती, तर भवानी तलवार कदाचित महाराष्ट्रात परत आली असती.

मंत्रालयातील महाराजांच्या तैलचित्राचा किस्सा…

अनेकांना विश्वास बसणार नाही, पण मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचं लावण्यात आलेलं तैलचित्र तत्कालिन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्याच काळात लावण्यात आलं होतं. या तैलचित्राविषयीचा किस्साही खास आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारात तैलचित्र लावल्यानंतर अंतुले यांनी स्वतः बाहेरून फेरफटका मारत, ते तैलचित्र बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थित दिसतंय ना याची खातरजमा करून घेतली होती.

    follow whatsapp