श्रावण महिना आणि गणेश उत्सव संपताच अंडी आणि चिकन महाग

मुंबई तक

• 10:09 AM • 21 Sep 2021

श्रावण महिन्यात अंडी आणि चिकन यांना मागणी नसते. जे नियमित मांसाहार करतात तेदेखील या संपूर्ण महिन्यात अंडी, चिकन मटण खात नाहीत. त्यानंतर येतो गणेश उत्सव या काळातही मांसाहर करण्याचं प्रमाण कमी आहे. अशात आता गणेश उत्सव आणि श्रावण महिना असं दोन्ही संपलं आहे. त्यानंतर अंडी आणि चिकनचे दर वाढले आहेत. चिकनचा दर प्रति किलो 10 […]

Mumbaitak
follow google news

श्रावण महिन्यात अंडी आणि चिकन यांना मागणी नसते. जे नियमित मांसाहार करतात तेदेखील या संपूर्ण महिन्यात अंडी, चिकन मटण खात नाहीत. त्यानंतर येतो गणेश उत्सव या काळातही मांसाहर करण्याचं प्रमाण कमी आहे. अशात आता गणेश उत्सव आणि श्रावण महिना असं दोन्ही संपलं आहे. त्यानंतर अंडी आणि चिकनचे दर वाढले आहेत. चिकनचा दर प्रति किलो 10 रूपयांनी वाढला आहे. तर अंडं हे एक रूपयाने महाग झालं आहे.

हे वाचलं का?

श्रावण व गणेशोत्सव संपताच अनेकजण पुन्हा मांसाहाराकडे वळतात. मासळी किंवा मटणाच्या तुलनेत कोंबडी व अंड्याचे दर काही प्रमाणात कमी असतात. त्यामुळे सर्वसामान्य वर्गाकडून कोंबडी आणि अंड्याला नेहमी मोठ्या प्रमाणात मागणी असते. श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात ब्रॉयलर कोंबडी 140 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 230 रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग पाच रुपये दराने विक्री केले जात होते.

आता ब्रॉयलर कोंबडी 150 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 240 रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग सहा रुपये दराने विक्री केले जात असल्याची माहिती कोंबडी विक्रेत्यांनी दिली. करोनाकाळात भीतीपोटी कोंबडीची मागणी घटल्यामुळे अनेकांनी पोल्ट्री बंद केल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आवक कमी आहे. येत्या काही दिवसांत मागणी वाढणार असली तरी, त्या तुलनेत कोंबडी आणि अंड्यांचा पुरेसा पुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे कोंबडी, अंड्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp