मागील काही वर्षांपासून जर आपण पाहिलं तर चीन भारताच्या सीमेवर काहीना काही कुरघोड्या करायचं सोडत नाही. आता देखील चीन सीमेवर आपली स्थिती मजबूत करण्यासाठी वास्तविक नियंत्रण रेषवर हायवे बनवण्याच्या तयारीत आहे. तशी माहिती एका मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. एलएसीवर हायवे बनवण्यासाठीची योजना चीनने आखली असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. हाँगकाँगवरून प्रकाशित होणाऱ्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ च्या माहितीनुसार तिबेटच्या ल्युंज काउंटी पासून शिंजियांग क्षेत्रातील कशगर माझापर्यंत जाणारा हा हायवे असणार आहे.
ADVERTISEMENT
चीनने आखलेल्या या योजनेचा अक्साई चीन तसंच भारतावर काय परिणाम?
ही योजना प्रस्तावित ३४५ निर्माण योजनेत समाविष्ट आहे. २०३५ पर्यंत ४ लाख किमीपेक्षा लांब हायवे बनवण्याचा उद्देश या कार्यक्रमात आहे. हा हायवे तिबेट, नेपाल आणि भारताच्या सीमा भागावरून जाणार आहे. ल्यूंज काउंटी हा अरुणाचल प्रदेशचा भाग आहे, ज्याला चीन दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो. हा हायवे कोना काउंटी वरून जाणार असल्याचं बोललं जात आहे, जो वास्तविक नियंत्रण रेषेच्या उत्तर भागात पडतो. कांबा काउंटीची सीमा सिक्कीमपासून जवळ आहे तर गयीरोंग काऊंटी नेपाळच्या सीमेजवळ आहे.
हाँगकाँग मीडिया रिपोर्टमध्ये आलेल्या वृतावर आणखी देखील अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी देखील भारताने सांगितले होते की, आमची सीमा भागांवर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर आहे. आता त्यात या हायवेची बातमी अशा वेळेस आली आहे, जेव्हा पूर्व लद्दाखच्या प्रश्नावर दोन्ही देशांची चर्चा सुरू आहे.
चीनने भारताच्या सीमेलगत असलेल्या डोकलामजवळ गाव वसवले आहे. या गावात प्रत्येक घराच्या बाहेर एक कार उभी असल्याचे सेटलाईटच्या दृश्यात पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणावरून २०१७ मध्ये चीन आणि भारताची सेना एकमेकांच्या समोर आली होती, त्या ठिकानापासून हे गाव ९ किमी अंतरावर आहे. अशात आता चीनने आपली नवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याला भारत कशापद्धतीने उत्तर देतो, हे पहावं लागेल.
ADVERTISEMENT