Chinchwad Bypoll wealth of candidate: पिंपरी-चिंचवड: चिंचवड पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bypoll) उमेदवारांची कोटींची उड्डाणं त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहेत. संपत्तीच्या (Wealth) बाबतीत नेमकी कोणी बाजी मारली आहे हेच आपण जाणून घेऊया सविस्तर. (chinchwad bypoll bjp ncp or independent how much wealth of which candidate)
ADVERTISEMENT
अश्विनी जगताप – भाजप
भाजपच्या वतीने अश्विनी जगताप यांनी निवडणूक आयोगात उमेदवार अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली. त्यानुसार अश्विनी जगताप यांची एकूण जंगम मालमत्ता 11 कोटी 4 लाख 47 हजार आहे, तर त्यांचे पती लक्ष्मण जगताप ज्यांचं निधन झालं, त्यांची जंगम मालमत्ता ५ कोटी ४६ लाख ४३ हजार रुपये, तर मुलगा आदित्यच्या नावानं ३१ लाख ३४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
अश्विनी जगताप यांच्याकडे रोख रक्कम 94 हजार 807 रुपये आहे. अश्विनी जगताप यांच्याकडे 26 लाख 78 हजार रुपयांच्या बँक ठेवी आहेत.
लक्ष्मण जगताप यांच्याकडे 3 कोटी 71 लाख 96 हजार रुपये बँक ठेवी होत्या. पण लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळे ही रक्कम त्यांच्या पत्नी अश्विनीच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अश्विनी जगताप यांच्याकडे 89 हजार रुपयांचे शेअर्स आहेत. तर लक्ष्मण जगताप यांच्याकडे 13 लाख 8 हजार रुपयांचे शेअर्स आहेत. हे शेअर्स देखील वारसाच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोस्टल सेव्हिंग:
अश्विनी जगताप यांची कुठलीही पोस्टल सेव्हींग नाही. तर लक्ष्मण जगताप यांची 4 लाख 33 हजारांची पोस्टल सेव्हींग आहे. ही रक्कम सुद्धा वारसाच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुलगा आदित्यच्या नावाने 3 लाख 87 हजार रुपयांच्या पोस्टल सेव्हिंग आहेत.
अश्विनी जगताप यांनी 8 कोटी 52 लाख 84 हजार रुपये दुसऱ्यांना कर्जाऊ दिले आहे. तर लक्ष्मण जगताप यांनी 1 कोटी 9 लाख 11 हजार रुपये, तर मुलगा आदित्यने 27 लाख 46 हजार रुपये दुसऱ्यांना कर्जाऊ दिले आहे. महत्वाचं म्हणजे जगताप कुटुंबाकडे कुठलंही वाहन नाही. ना लक्ष्मण जगताप नात्यांच्या पत्नीच्या नावाने वाहन आहे.
अश्विनी जगताप यांच्याकडे 2 कोटी 22 लाख 61 हजार रुपयांचं सोनं-चांदी आहे. तर लक्ष्मण जगताप यांच्याकडे 12 लाख 53 हजार रुपयांचे दागिने होते. इतर मालमत्तांमध्ये अश्विनी जगताप यांच्याकडे 40 हजार रुपयांचा मोबाइल आहे, तर लक्ष्मण जगताप यांच्याकडील रिव्हॉल्वर होते. ते आमदार होते, त्यांचं बाकी असलेलं वेतन, आयकर, टीडीएस, जीएसटीची रक्कम 35 लाख 39 हजार रुपयांची रक्कम दाखवण्यात आली आहे.
स्थावर मालमत्ता:
अश्विनी जगताप यांच्या नावाने 7 लाख 46 हजार रुपयांची साताऱ्यातल्या कराड इथं शेतजमीन आहे.
लक्ष्मण जगताप यांच्या नावाने पुणे जिल्ह्यातच पाच ठिकाणी शेतजमीन आहे. ज्याची किंमत 6 कोटी 88 लाख 88 हजार रुपये आहे.
जगताप यांनी भूखंडाविषयी माहिती दिली आहे. अश्विनी जगताप यांच्या नावाने कुठलाही भूखंड नाही. पिंपळे गुरव यांना इथं सात बिगरशेती जमीन आहे. ज्याची किंमत 1 कोटी 75 लाख 77 हजार रुपये आहे. अश्विनी जगताप यांच्या नावाने पुण्यातल्या हवेलीत वाणिजिक इमारत आहे, ज्याची किंमत 2 कोटी 80 लाख 50 हजार रुपये आहे. तर लक्ष्मण जगताप यांच्या नावाने दोन इमारती आहेत. ज्याची किंमत 2 कोटी 10 लाख रुपये आहे. अश्विनी जगताप आणि लक्ष्मण जगताप यांच्यावर बँकांचं कुठलंही कर्ज नाही. पण, त्यांच्यावर एका संस्थेचं 12 लाख रुपयांचं कर्ज आहे, लक्ष्मण जगताप यांच्यावर खासगी संस्थांचं 6 कोटी 39 लाख 30 हजार रुपयांचं कर्ज आहे.
अश्विनी जगताप यांची एकूण स्थावर मालमत्ता 2 कोटी 87 लाख रुपये, तर लक्ष्मण जगताप यांची 3 कोटी 33 लाख रुपये स्थावर मालमत्ता आहे.
राहुल कलाटे:
चिचंवडमधील अपक्ष उमेदवार राहुल कलाटें हे ४६ वर्षांचे आहे. त्यांचं बीकॉम पर्यंतचं शिक्षण झालंय. शेती आणि व्यापार हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. सोनं, जमीनजुमला, रोख रक्कम पकडून कलाटेंची एकूण संपत्ती तब्बल ६० कोटी ९९ लाख रुपयांच्या घरात आहे.
स्थावर मालमत्तेचा विचार केला तर कलाटेंच्या नावावर ६० कोटी ३ लाख ७६ हजार ३१९ रुपयांच्या जमीनी आणि २ फ्लॅट आहेत. कलाटेंकडे खेड, मुळशी येथे जमिनी आहेत. तर, रहाटणी आणि वाकडला सुसज्ज फ्लॅट्स आहेत.
जंगम मालमत्तेत कलाटेंकडे ९२ हजार ६४० रुपये रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नी वृषाली यांच्याकडे ५३ हजार ७५० रुपये रोकड आहे. कलाटेंच्या नावावर १५ तोळे सोनं आहे. तर त्यांच्या पत्नीकडे तब्बल ५२ तोळे सोनं आहे. याशिवाय कलाटेंकडे ५५ हजारांची रिव्हॉल्वरही आहे. राहुल कलाटेंकडे बँकेतील ठेवी आणि इतर रक्कम मिळून एकूण ६२ लाख २७ हजार १४४ रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ३३ लाख १७ हजार ४५७ रुपये आहेत.
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्याकडे ३१ कोटींची संपत्ती आहे. तर, राष्ट्रवादीच्या नाना काटेंकडे १५ कोटींची संपत्ती आहे. निवडणुकीच्या रिंगणात कलाटेंच्या पदरात किती मतं पडतात हे निकालाच्या दिवशी कळेलच. मात्र, गडगंज संपत्तीच्या बाबतीत तरी कलाटेच आघाडीवर आहेत हे नक्की.
नाना काटे:
चिंचवड विधानसभा मतदारसंघातले तीनही प्रमुख उमेदवार हे कोट्यधीश आहेत. पण आपल्या दोन प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत नाना काटे हे संपत्तीच्याबाबतीत काहीसे पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी मिळालेले नाना काटे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सुमारे १९ कोटी ३० लाख १२ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. 49 वर्षांच्या नाना काटे यांचं शेती, हॉटेल आणि बांधकाम व्यवसायातून वार्षिक उत्त्पन्न 14 कोटी 97 लाख 780 रुपये असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवण्यात आली आहे.
काटेंचं दहावीपर्यंत शिक्षण झालंय. नाना काटे आणि त्यांच्या पत्नी शितल काटे यांच्या नावे बँकेत 2 कोटी 14 लाख 48 हजार 297 रुपये आहेत. पती–पत्नीच्या नावे मिळून 550 ग्रॅम सोनं आणि 500 ग्रॅम चांदी असं एकूण 28, लाख 60 हजार किंमतीचे दागिने आणि वस्तू आहेत. पुण्यातल्या शिरुर, पिंपळे सौदागर रहाटणी, ताथवडे इथे शेतजमी, इमारत या भागातील एकूण 15 कोटी 29 लाख 60 हजार रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता आहे.
ज्यात सर्वाधिक महाग ताथवडे इथे विकसित केलेली वाणिज्य इमारत आहे. जिची किंमत 8 कोटी 45 लाख इतकी आहे. तर काटेंवर 1 कोटी 90 लाखांचे बॅकेचं कर्ज आहे.
नाना काटे यांच्याबरोबर निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अश्विनी जगताप, राहुल कलाटे यांनी संपत्तीच्या तुलनेत बाजी मारली असली तरी मालकी असेलल्या रिव्हॉल्वरमध्ये काटे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुढे आहे. काटेंकडे तब्बल 6 लाखांची बंदूक आहे. तर अश्विनी जगताप यांच्याकडे 25 हजारांची तर, कलाटेंकडे 55 हजारांची बंदूक आहे.
ADVERTISEMENT