Chitra Wagh: “असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल”, वाघांचा चढला पारा

मुंबई तक

21 Mar 2023 (अपडेटेड: 24 Mar 2023, 06:56 AM)

old pension scheme maharashtra। viral Video । chitra Wagh tweet : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सात दिवसानंतर संप मागे घेण्यात आला. दरम्यान, संपातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, एका व्हिडीओवरून भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या महिलेबद्दल देवेंद्र फडणवीस मोठेपणा दाखवतील, […]

Mumbaitak
follow google news

old pension scheme maharashtra। viral Video । chitra Wagh tweet :

हे वाचलं का?

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सात दिवसानंतर संप मागे घेण्यात आला. दरम्यान, संपातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, एका व्हिडीओवरून भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या महिलेबद्दल देवेंद्र फडणवीस मोठेपणा दाखवतील, पण आम्ही क्षमा करणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी व्हायरल व्हिडीओतील महिलेवर टीका केली आहे. तसेच या महिलेवर कारवाई करण्याची मागणी मुख्य सचिवांकडे केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण??”

‘त्या’ फोटोवरून चित्रा वाघ भडकल्या, ठाकरेंच्या महिला नेत्याला सुनावलं

असं वक्तव्य सटवीच करू शकेल; चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे की, “संपातील 1 महिला कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर व देवेंद्र फडणवीसजी यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली, तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..!”

“मोर्चा… आपल्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी संविधानाने दिलेलं हत्यार आहे, पण त्यात हे असं वक्तव्य एखादी “सटवी”च करू शकेल.”

‘नंगानाच’ चालू देणार नाही : चित्रा वाघ यांनी उर्फीला ठणकावलं, चाकणकरांनाही भिडल्या!

“FB वर (फेसबुकवर) दुसऱ्याची पोस्ट शेअर केली म्हणून मागच्या सरकारने एका मुलीला थेट तुरूंगात पाठवलं… इथे तर थेट हातात माईक घेऊन अपशब्द बोलले गेले; हा देशाचे पंतप्रधान व राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का ?? पोलिसांनी स्युमोटो अंतर्गत कारवाई करावी”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“सरकारी यंत्रणेतील हे राजकीय पाताळ षडयंत्री एकतर संघटनेने शोधून बाजूला सारावे, नाहीतर राज्याच्या मुख्य सचिवांनी तरी त्यांना घरी बसवावे. आम्ही शोध घेतला तर सापडायला फार वेळ लागणार नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे”, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी मांडली आहे.

चित्रा वाघ पुढे म्हणतात, “देवेंद्र फडणवीसजी कदाचित मनाचा मोठेपणा दाखवतील पण आम्ही क्षमा करणार नाही आणि खपवून तर मुळीच घेणार नाही”, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

Old Pension Scheme: महिला नेमकं काय म्हणाली आहे?

जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी झालेल्या संपातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत एक महिला भाषण करत असून, ती सरकारवर टीका करत आहे. ही महिला म्हणते, “तुम्हाला पेन्शन भेटत नाही. नव्या पेन्शनमध्ये पगार किती भेटणार आहे? सात हजार, कुणाला चार हजार, कुणाला दोन हजार… या दोन हजारात, तीन हजारात #*@$ बायकोचं लिपस्टिक तरी येतं का? येतं का याच्या बायकोचं लिपस्टिक”, असं या महिलेनं म्हटलेलं आहे.

    follow whatsapp