Talaye Landslide : काळजी करू नका! सरकार पाठिशी, मुख्यमंत्र्यांकडून तळये ग्रामस्थांचं सांत्वन

मुंबई तक

• 09:42 AM • 24 Jul 2021

रायगड जिल्ह्यातील तळये गावातली घटना ही आक्रीत म्हणतात तशीच आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्याला हे अनुभव आहेत. असं आक्रीत घडतं तेव्हा त्यातून शिकलंच पाहिजे. डोंगराच्या पायथ्याशी जी घरं आहेत त्या सगळ्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सरकारकडून केलं जाणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही स्थिती चिंताजनक आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तळये गावातल्या गावकऱ्यांना […]

Mumbaitak
follow google news

रायगड जिल्ह्यातील तळये गावातली घटना ही आक्रीत म्हणतात तशीच आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्याला हे अनुभव आहेत. असं आक्रीत घडतं तेव्हा त्यातून शिकलंच पाहिजे. डोंगराच्या पायथ्याशी जी घरं आहेत त्या सगळ्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सरकारकडून केलं जाणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही स्थिती चिंताजनक आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तळये गावातल्या गावकऱ्यांना तातडीने मदत केली जाणार आहे. त्यांची नुकसान भरपाई आणि इतर गोष्टी असतील ते सरकारर्फे केलं जाईल असंही आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

हे वाचलं का?

महाड, खेड, रायगड, चिपळूण या ठिकाणची परिस्थिती भीषण होती. बऱ्याच ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. जीवितहानी होऊ नये याची काळजी घेतली जाते आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक हे वेळेवर पोहचतं आहे मात्र जिथे परिस्थिती बिकट झाली आहे त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथक पोहचण्यासही वेळ लागतो आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मुसळधार पाऊस कोसळत असतानाच तळीये गावातील 30 घरांवर दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच गडप झालं. त्यामुळे गाव शोकसागरात बुडालं आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गावात आले होते.

पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो. त्यानंतर ज्या काही आक्रीत घटना घडतात त्या टाळण्यासाठी सरकार आराखडा तयार करणार आहे. धोकादायक वस्त्यांमध्ये राहणऱ्या सगळ्यांचं आम्ही पुनर्वसन करणार आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हवामान खातं रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट देत असतं. मात्र प्रत्यक्षात पाऊस किती पडेल हे सांगताच येत नाही. ढगफुटी झाल्यानंतर इतका पाऊस कोसळला ज्यामुळे दाणादाण उडाली. सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात तणाव होता. कोकणात पडणारा पाऊस आणि त्यातून होणारा संहार पाहिल्यानंतर वॉटर मॅनेजमेंट कसं करता येईल त्यासाठी आम्ही विचार करतो आहोत. पाण्याचं व्यवस्थापन कसं करता येईल त्याबाबतही आम्ही विचार करत आहोत.

ज्या गावकऱ्यांवर हे संकट कोसळलं आहे त्या सगळ्यांचं पुनर्वसन केलं जाईल. कुणीही गावकऱ्यांनी काळजी करू नये असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp