कोरोनाची लढाई कठीण होणार, तज्ज्ञ डॉक्टरांनी मैदानात उतरावं – उद्धव ठाकरेंचं डॉक्टरांना आवाहन

मुंबई तक

• 09:11 AM • 16 May 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असणाऱ्या महाराष्ट्रात १ जून पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात सरकारी यंत्रणांना काहीप्रमाणात यश मिळत असलं तरीही अद्याप मृत्यूदर नियंत्रणात आलेला नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांशी माझा डॉक्टर या उपक्रमाअंतर्गत संवाद साधत कोविड विरुद्ध लढाईत मैदानात उतण्याचं आवाहन केलं. डॉ. […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असणाऱ्या महाराष्ट्रात १ जून पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात सरकारी यंत्रणांना काहीप्रमाणात यश मिळत असलं तरीही अद्याप मृत्यूदर नियंत्रणात आलेला नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांशी माझा डॉक्टर या उपक्रमाअंतर्गत संवाद साधत कोविड विरुद्ध लढाईत मैदानात उतण्याचं आवाहन केलं.

हे वाचलं का?

डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. राहुल पंडीत यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधला. अनेक रुग्ण या काळात घरच्या घरी उपचार घेत आहेत. अशावेळी उपचारांचं होम मॅनेजमेंट करण्याचं शिवधनुष्य आपल्याला उचलावं लागणार आहे. याचसोबत जवळच्या जम्बो सेंटर्समध्ये आपण सेवा देऊ शकलात तर रुग्णांना दिलासा मिळेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सध्याच्या घडीला ७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणं नसल्यामुळे घरातच उपचार घेत आहेत. अशा रुग्णांवर लक्ष ठेवणं, त्यांच्या उपचार पद्धतीवर नियंत्रण ठेवणं ही काम देखील महत्वाची आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर शरीर साखरेचं पोतं होऊ नये याची काळजी घेणं, सहव्याधींवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. हे करण्यात आपल्याला यश आलं तर हे संकट आपण वेळीच रोखू शकतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp