बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणा आणि खंडणी प्रकरणात संशयाची सुई वाल्मिक कराडवर आहे. जसजसा दिवस उलटतोय, तसतशा वाल्मिक कराडच्या एक एक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. पण फक्त विषय वाल्मिकपर्यंत राहिला नाहीये. कारण वाल्मिकचा मुलगा सुशील वाल्मिकी कराड आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध सोलापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case MCOCA : संतोष देशमुख प्रकरणात मकोका दाखल, पण वाल्मिक कराड मात्र...
सोलापूरमधील एक महिला, तिचा नवरा आणि त्यांची दोन मुलं परळी येथे राहत होती. महिलेचा नवऱ्याचे सुशील वाल्मिकी कराडकडे काम करत होता. त्यांच्या नावावर दोन ट्रक, दोन कार, दोन दुचाकी आणि एक प्लॉट होता. पीडितेची मालमत्ता हडप करण्यात आली असा आरोप आहे. या दाम्पत्याची संपत्ती अनिल मुंडे यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली. तसंच महिलेचं अडीच तोळे सोनं हे परळीतील बालाजी टाक ज्वेलर्स ला बळजबरीने विकायला लावलं आणि त्याचे आलेले पैसे सुशिल कराड याने घेतले. तसंच तिच्या लहान मुलीलाही मारहाण केली, अशी फिर्याद पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी तक्रारदाराची दखल न घेतल्यानं, पीडित महिलेने सोलापूरच्या पोलिस आयुक्तांकडे सविस्तर लेखी तक्रार केली, पण सोलापूरच्या पोलिस आयुक्तांनीही त्याची दखल घेतली नाही. यावर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्याला पत्र लिहिलं. तक्रार नोंदणीकृत पोस्टाने सोलापूरचे पोलीस आयुक्त आणि बीडचे पोलीस अधीक्षक आणि वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली होती. पण कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी त्याकडं लक्ष दिलं नाही. त्ंयाच्याविरुद्ध कोणताही खटला दाखल करण्यात आला नाही असं त्या महिलेने सांगितले.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : "शरद पवार चाणक्य, म्हणून...", पवारांनी RSS चं कौतुक केल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?
सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर, सुशील कराड, अनिल मुंडे, गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींचे जबाब मागवले असून, आरोपींनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आज आरोपींसाठी वकील नसल्यानं न्यायालयाने चौकशीची तारीख 13/1/2025 निश्चित केली आहे. त्यामुळे आता सुशील वाल्मिक कराडचा पाय खोलात जाणार असल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
