देश Corona च्या संकटात असताना लसींच्या किंमतीत नफेखोरी का?- सोनिया गांधी

मुंबई तक

• 08:58 AM • 22 Apr 2021

Politics on Corona vaccine – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरू होणार आहे. या टप्प्यात आता 18 वर्षे आणि त्यावरील वयाच्या सगळ्यांना ही लस दिली जाणार आहे. मात्र हा तिसरा टप्पा सुरू होण्याआधीच लसीकरणावरून वाद सुरू झाला आहे. यावरून आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं […]

Mumbaitak
follow google news

Politics on Corona vaccine – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरू होणार आहे. या टप्प्यात आता 18 वर्षे आणि त्यावरील वयाच्या सगळ्यांना ही लस दिली जाणार आहे. मात्र हा तिसरा टप्पा सुरू होण्याआधीच लसीकरणावरून वाद सुरू झाला आहे. यावरून आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी एकाच लसीच्या तीन किंमती कशा काय? हा प्रश्न विचारला आहे.

हे वाचलं का?

सिरम इन्स्टिट्युटने बुधवारीच राज्य सरकार आणि केंद्र सरकारसाठी लसींच्या वेगवेगळ्या किंमती सांगितल्या. यावरूनच सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारला आहे की देश कोरोनाच्या संकटात असताना लसींच्या किंमतींमध्ये फरक का केला जातो आहे? कोरोनाच्या काळात नफेखोरीला प्रोत्साहन का दिलं जातं आहे?

केंद्र सरकारने वेळप्रसंगी कर्ज काढावं पण सर्वांचं लसीकरण करावं; नाना पटोले यांचं वक्तव्य

काय म्हटलं आहे सोनिया गांधी यांनी पत्रात?

सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात हे म्हटलं आहे की आधीच देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. अशा वेळी बेड्स, औषधं, ऑक्सिजन यांचा तुटवडा भासतो आहे. अशात मोदी सरकार नफेखोरीला प्रोत्साहन कसं काय देऊ शकतं? सिरम इन्स्टिट्युटने लसींच्या वेगवेगळ्या किंमती जाहीर केल्या आहेत. याचा थेट परीणाम हा सामान्य माणसांवर होणार आहे. या गोष्टीला काय अर्थ आहे?

सिरम इन्स्टिट्युटने कालच लसींच्या किंमती जाहीर केल्या आहेत. सिरमच्या कोव्हिशिल्ड या लसीसाठी राज्य सरकारला 400 रूपये आणि खासगी रूग्णालयांना 600 रूपये मोजावे लागणार आहेत. ज्याचा परिणाम थेट लस घेण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांवर होणार आहे. व्हॅक्सिन तयार करणारी एकच कंपनी केंद्र सरकारसाठी वेगळा दर आणि राज्य सरकारसाठी वेगळा दर कसा काय तयार करू शकते? सरकारने हे धोरण तातडीने मागे घेतलं पाहिजे त्यामुळे 18 वर्षे किंवा त्यावरील वयाच्या लोकांना व्हॅक्सिन देणं सोपं होऊ शकतं असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

Covishield लसीची किंमत जाहीर, ‘ही’ लस घेण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार?

सिरमने ठरवलेल्या दरांनुसार केंद्र सरकारसाठी हा दर 150 रूपये,, राज्य सरकारांसाठी हा दर 400 रूपये तर खासगी रूग्णालयांसाठी हा दर 600 रूपये इतका आहे. एकाच कंपनीचा दर वेगवेगळा कसा काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. भारतात कोरोनाचं संकट मोठं आहे अशा स्थितीत ही अशी नफेखोरी बरी नाही असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे. एकाच लसींच्या वेगवेगळ्या किंमतींचं हे धोरण मागे घ्यावं अशीही विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

    follow whatsapp