Modi Surname case : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; ‘मोदी’ प्रकरण काय?

मुंबई तक

23 Mar 2023 (अपडेटेड: 24 Mar 2023, 06:55 AM)

rahul gandhi Convicted in modi surname case: मोदी आडनावाबद्दल केलेल्या एका प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोषी ठरवलं. या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामी केल्या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. (rahul gandhi Convicted by surat court in modi surname case) […]

Mumbaitak
follow google news

rahul gandhi Convicted in modi surname case: मोदी आडनावाबद्दल केलेल्या एका प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोषी ठरवलं. या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामी केल्या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. (rahul gandhi Convicted by surat court in modi surname case)

हे वाचलं का?

2019 मधील प्रकरणात सुरत सत्र न्यायालयाने आज निकाल दिला. राहुल गांधी यांना दोषी ठरवत सुरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं. दरम्यान, राहुल गांधी यांना न्यायालयात लगेच दिलासाही मिळाला. न्यायालयाने राहुल गांधींना जामीनही मंजूर केला असून, वरच्या न्यायालयात जाण्यास परवानगीही दिली आहे.

Rahul Gandhi यांचा पहिला पगार किती होता? जॉबला कुठे होते?

राहुल गांधी यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सूरत सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

मोदी आडनाव बदनामी प्रकरण : राहुल गांधी काय म्हणाले होते?

राहुल गांधींविरोधात दाखल करण्यात आलेल्या बदनामीचं प्रकरण 2019 मधील आहे. राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकात प्रचारसभेत मोदी आडनावावरून टीका केली होती.

Rahul Gandhi: पंतप्रधान झालात तर, सर्वात आधी काय कराल? दिलं उत्तर…

प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले होते की, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव एकच का आहे? सर्व चोरांचं नाव मोदी का असतं?

राहुल गांधींच्या या विधानावर आक्षेप घेत भाजपच्या आमदारांने अवमानना याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये प्रचारसभेत बोलताना सर्व चोरांचे आडनाव मोदी का? असं म्हणून मोदी समुदायाला बदनाम केले. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पूर्णेश भूपेंद्र पटेल यांनी ही याचिका दाखल केली होती. भूपेंद्र पटेल हे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते.

Rahul Gandhi : भारतात भाजप रॉकेल ओतून आग लावतं आहे, केम्ब्रिज विद्यापीठात आरोप

राहुल गांधींना आरोप लावले होते फेटाळून

राहुल गांधी या प्रकरणात न्यायालयात हजर झाले होते. राहुल गांधी न्यायालयाला सांगितलं होतं की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. प्रचारसभेत असं काही म्हणाल्याचं मला आठवत नाही. सूरत न्यायालयाने या प्रकरणात कर्नाटकातील तत्कालीन निवडणूक अधिकारी आणि भाषण रेकॉर्ड करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या व्हिडीओ रेकॉर्डरची साक्ष नोंदवली होती. त्यानंतर राहुल गांधींचा जबाब नोंदवला गेला होता.

न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर राहुल गांधींचं ट्विट

सूरत सत्र न्यायालयाने बदनामीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचा एक विचार ट्विट केला आहे. “माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हाच माझा ईश्वर आहे, अहिंसा त्याला साध्य करण्याचं साधन आहे”, असं महात्मा गांधींचं हे विचार आहे.

    follow whatsapp