Congress वाढवण्यासाठी पाठवलं, तोडण्यासाठी नाही! बड्या नेत्यानं पटोलेंना सुनावलं

मुंबई तक

07 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:05 AM)

congress leader sunil kedar vs state president nana patole : मुंबई : विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सुधीर तांबे, सत्यजीत तांबे यांचं निलंबन झालं आहे. अहमदनगर जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली. यावरुन नाराज होत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर आक्षेप […]

Mumbaitak
follow google news

congress leader sunil kedar vs state president nana patole :

हे वाचलं का?

मुंबई : विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सुधीर तांबे, सत्यजीत तांबे यांचं निलंबन झालं आहे. अहमदनगर जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली. यावरुन नाराज होत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत त्यांच्यासोबत काम करण्यासाठी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी असमर्थता दर्शविली आहे.

दरम्यान, आता याच सगळ्या वादावर “तुम्हाला काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी पाठवलं आहे, तोडण्यासाठी नाही. तिच भूमिका घ्या”, असं म्हणतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनिल केदार यांनी नाना पटोले यांना सुनावलं आहे. मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केदार बोलत होते. यावेळी त्यांनीही पटोले यांच्या कार्यशैलीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आक्षेप व्यक्त केला. (congress leader sunil kedar slams congress state president nana patole on his working style)

काय म्हणाले सुनिल केदार?

बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत. खूप उन्हाळे, पावसाळे त्यांनी या पक्षाचे पाहिले आहेत. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुका पाहिल्यास बाळासाहेब थोरात यांचं नेतृत्व किती मोठं आहे, हे लक्षात येईल. तत्कालिन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता आणि जबाबदारी थोरात यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर थोरात यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यावेळी निवडणुका लढविल्या. अनेक प्रसारमाध्यमांनी सांगितलं होतं काँग्रेसच्या किती जागा निवडून येतील याचा अंदाज नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कसब लावून आश्चर्य वाटेल असे ४४ आमदार निवडून आणले. या सगळ्या प्रक्रियेनंतर आघाडी सरकार चालविण्यात त्यांनी भूमिका वठवली आहे.

Satyajeet Tambe vs Congress : एबी फॉर्मवरुन वाद; कुणाची बाजू खरी?

पक्षातील वाद पक्षातचं मिटवले पाहिजेत :

आता विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, यात नगर जिल्ह्यात झालेली घटना ही दुखःद आहेच. आम्हाला सगळ्यांना त्याच्या वेदना आहेत. पण कधी कधी राजकारणामध्ये काही गोष्टींमध्ये थोडा वेळ जाऊन देणं गरजेचं आहे. एकदम त्याच्याबाबत तडकाफडकी निर्णय घेणं, ज्या कुटुंबाच्या दोन दोन पिढींनी काँग्रेससाठी आपलं सर्वस्व लावलं आहे, त्यांच्याबद्दल विचार करत असताना, वक्तव्य करत असताना, थोडं थांबून, थोडं विचार करुन, नीट समजून घेऊन त्यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेऊन पुढे गेलं असतं बरं झालं असतं.

पुष्कळदा आमचे नेते राहुल गांधी यांनी सांगितलं आहे की पक्षातील विषय पक्षातमध्येच मिटवले पाहिजेत. पक्षाचे विषय पक्षाचे वाद हे चव्हाट्यावर नेऊ नये. कुठेही मिडीयाच्या माध्यमातून याला जास्त उजाळा देऊन स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा स्वतःचं त्याठिकाणी असलेलं कसबं आणि स्वतःचं अनुभव वापरुन चार भिंतीच्या आतमध्ये बसून आपण तो प्रश्न सोडवला पाहिजे ही गोष्ट आम्ही सर्वांनीच समजून घेणं गरजेचं आहे.

घाईगडबड करुन निर्णय घेणं ही चुकीची पद्धत आहे :

कधीकाळी स्वबळावर सरकार स्थापन करणारा काँग्रेस पक्ष आज युतीमध्ये सरकार स्थापन करत आहे. अशावेळी पक्षमजबूतीचं महत्वाचं की निव्वळ शिस्त महत्वाची? शिस्त असलीच पाहिजे, नाही असं नाही. पण काहीवेळेस निर्णय घेताना थोडं सबुरीनं निर्णय घेतला, अनुभवी नेत्यांचा विचार घेऊन पुढे गेलं तर असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. घाईगडबड करुन निर्णय घेणं ही चुकीची पद्धत आहे.

“Nana Patole यांच्यासोबत काम करणं अवघडं”; बाळासाहेब थोरांतांचा लेटरबॉम्ब

प्रश्न राज्यात सोडविण्याचा प्रयत्न करु :

आम्ही बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊ. आम्ही जे सर्व वरिष्ठ आमदार होतो, मंत्री होतो, ते सर्व मिळून हा प्रश्न महाराष्ट्रातच सोडविण्याचा प्रयत्न करु. दिल्लीमध्ये जाऊन प्रश्न सोडविण्यापेक्षा आम्ही १५ तारखेला महाराष्ट्रातच सर्व मिळून बसू आणि हा प्रश्न सोडवू. बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या वडिलांनी काँग्रेससाठी खूप सोससलं आहे, अशा वेळी त्यांचा मान, सन्मान झाला पाहिजे असं व्यक्तीशः माझं मत आहे.

काँग्रेसमधील संरजामशाही संपवली पाहिजे ही प्रदेशाध्यक्षांची भूमिका योग्य आहे का?

प्रदेशाध्यक्षांनी या गोष्टीचा पुनर्विचार करायला हवा. आज आपली प्रायोरिटी पक्ष मजबूत करणं आहे. त्या दृष्टीकोनातून पुढे गेलं पाहिजे. घराण्यांनी काय केलं यापेक्षा आम्ही काय केलं हे याचा विचार करणं गरजेचं आहे. आम्ही नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडून आणली. अभिजीत वंजारींना निवडून आणलं. सुधाकर अडबालेंना निवडून आणलं. अडबालेंचं नाव निश्चित करत असताना आम्ही स्थानिक पातळीवर जी भूमिका घेतली ती तुम्ही सर्वांनी माध्यमांवर दाखविली.

अशा सगळ्यांचा विचार करुन तर मला असं वाटतं की संयमी भूमिका ठेवली पाहिजे. ज्या नेत्यांनी दोन दोन पिढ्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली त्यांच्या बाबतीत मान,सन्मान होणं गरजेचा आहे. निर्णय घेताना थोडं थांबून, थोडं विचार करुन पुढे गेलं पाहिजे.जमत नसेल तर पक्षासाठी आपण स्वतःचा इगो लहान करुन भेटायला गेलं पाहिजे आणि प्रश्न निकाली काढायला हवा.

राहुल गांधी यांनीही कधी अशी प्रखर आणि कठोर भूमिका घेतली नाही. त्यांनी भारत जोडोमधून सांगितलं नफरत छोडो, भारत जोडो. आता नफरत छोडो म्हणजे काय राहिलं? अजूनही हे समजत नसेल तर दुर्भाग्य आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. हे ज्यानं समजून घेतलं तो पुढे जाऊ शकतो.

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? सुधीर तांबेंवर विचार करुन कारवाई करायला हवी होती का?

१०० टक्के. असे निर्णय घेत असताना थोडं थांबून, थोडं विचार करुन, नीट समजून घेऊन पुढे जायला पाहिजे. एवढा तडकाफडकी निर्णय घेण्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रात आमच्या पक्षाची आहे का? याचा विचार करणं गजरेचं आहे. काही गोष्टी हे रोज वर्तमानपत्रात जाऊन पक्षाच्या भानगडी बाहेर येतील यापेक्षा पक्षांतर्गत बसून मार्ग काढला पाहिजे. शेवटी आम्हाला पक्ष मोठा केला पाहिजे. पक्ष मोठा नाही केला तर आम्ही केवळ बॅनर्सपुरते मर्यादित राहू. प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्षाचा मी एक शिपाई आहे, मला राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी पाठवलं आहे, काँग्रेस पक्ष तोडण्यासाठी नाही ही भूमिका घेऊन हा प्रश्न निकाली काढला पाहिजे.

    follow whatsapp