Controversial Rashmi Shukla Promoted :
ADVERTISEMENT
दिल्ली : फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने (Appointments Committee of Cabinet) एकूण २० अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. यात महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यासह आयपीएस अधिकारी सदानंद दाते, अतुलचंद्र कुलकर्णी यांचा समावेश आहे. (IPS Rashmi Shukla is accused of tapping phones and leaking reports on scams in transfers of police officers. Now he has been promoted.)
सदानंद दाते हे सध्या मुंबई पोलील दलात कार्यरत होते. त्यांनी नुकताच महाराष्ट्र एटीएस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते मीरा भाईंदर, वसई विरारचे पोलीस आयुक्त होते. तर त्यापूर्वी त्यांनी केंद्रात ३ वर्षं प्रतिनियुक्तीवर काम केलं आहे. यात न्याय-विधि विभागात संयुक्त सचिवपद, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
Shinde-BJP मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला ठिणगी? श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ पुन्हा टार्गेटवर!
अतुलचंद्र कुलकर्णी हे सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असून ते राष्ट्रीय तपास संस्थेचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. कुलकर्णी यांनी यापूर्वी पुण्यात अपर पोलीस महासंचालक सुधारसेवा (कारागृह), महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग तसंच मुंबईतील सह पोलीस आयुक्त (गुन्हे) अशा पदांवर काम केलं आहे. मुंबईतील पोस्टिंगपूर्वी ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये केंद्रातच प्रतिनियुक्तीवर होते.
रश्मी शुक्ला याही सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्या नागरी संरक्षण विभागात कार्यरत होत्या. मात्र या दरम्यान त्यांनी निवृत्तीपर्यंत म्हणजे ३० जून २०२४ पर्यंत प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यापूर्वी पुणे पोलीस आयुक्त तसेच राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त म्हणून वर्षे काम पाहिलं आहे. याच काळात त्यांच्यावर फोन टॅप केल्याचा आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील घोटाळ्याचा अहवाल लीक केल्याचा आरोप आहे.
Ramesh Bais : झारखंडमध्ये सरकारशी संघर्ष; महाराष्ट्रात काय होणार?
त्यामुळे शुक्ला ठरल्या पात्र?
काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील तपास बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात म्हणून केंद्र सरकारमध्ये प्रयत्न सुरू केल्याच्या चर्चा होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिणामी त्यांना महासंचालकपदावर त्या पात्र ठरल्या नव्हत्या, असं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT