Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढला, दोघांनी गमावला जीव; मुंबईत अधिक धोका

मुंबई तक

• 12:21 AM • 15 Mar 2023

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचं सावट पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोराना संसर्गाचा हा वेग वाढलेला आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 1.48 लाख कोरोनाबाधित रूग्णांना आपला जीव गमवावा लागला. तसंच, मंगळवारी (14 मार्च) राज्यात 155 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातून […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचं सावट पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोराना संसर्गाचा हा वेग वाढलेला आहे.

राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत 1.48 लाख कोरोनाबाधित रूग्णांना आपला जीव गमवावा लागला.

तसंच, मंगळवारी (14 मार्च) राज्यात 155 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातून सोमवारी (13 मार्च) आलेल्या अहवालापेक्षा ही रूग्ण संख्या दुप्पट आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 81,38,653 रुग्ण आढळले आहेत. पुण्यात 75 नवे रूग्ण तर, मुंबईत 49 कोरोना रूग्ण आढळले.

अशा स्थितीत मुंबईला कोरोना प्रादुर्भावाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp