नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच धडकलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरू लागला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घसरू लागला असून, आज दिवसभरात महाराष्ट्रात 6 हजार 107 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
ADVERTISEMENT
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज दिवसभरात 16,035 रुग्ण कोरोनातून बरे होऊ घरी परतले. त्यामुळे सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होऊन लाखाच्या आत आली आहे. राज्यात आजपर्यंत 75,73,069 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 96.89 टक्क्यांवर आला आहे.
राज्यात आज दिवसभरात 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना मृतांची एकूण संख्या 1 लाख 43 हजार 155 वर पोहोचली आहे. तर राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.83 टक्के इतका आहे.
आजपर्यंत राज्यात 7,57,68,634 जणांचे नमुने प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी 78,16,243 म्हणजेच 10.32 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 6,39,490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून, 2,412 व्यक्ती इन्स्टिट्युशनला क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील ओमिक्रॉन आकडेवारी
राज्यात आजपर्यंत एकूण 3,334 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैकी 2,043 रुग्ण बरे झाले असून, आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. ओमिक्रॉन संशयित 7 हजार 452 नमुने जनुकीय निर्धारणासाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 7,014 नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून, 438 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे.
मुंबईत आढळले 447 रुग्ण
मुंबईतही तिसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याचं बघायला मिळालं होतं. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. मुंबईत दिवसभरात 447 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर बऱ्या झालेल्या 798 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
मुंबईतील सक्रीय रुग्णसंख्या4 हजार 789 इतकी असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 808 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. रिकव्हरी रेटही 98 टक्के इतका झाला असून, दिवसभरात फक्त एका रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 16,667 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आढळून आलेल्या 447 रुग्णांपैकी 380 रुग्ण लक्षणं नसलेले आहेत.
ADVERTISEMENT