कापूस उत्पादक शेतकऱ्याचे अच्छे दिन, प्रति क्विंटल भावाने ओलांडला ११ हजारांचा टप्पा

मुंबई तक

• 03:30 AM • 03 Feb 2022

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातल्या बळीराजावर कायम संकटांची मालिका ओढावली आहे. अवकाळी पाऊस, हातात आलेलं पिक वाया जाणं, वादळी वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पिक वाया गेलं. परंतू कालांतराने कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्यात अच्छे दिन आल्याचं चित्र पहायला मिळतं आहे. अकोल्याच्या अकोट येथील बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल ११ हजारांचा भाव मिळतो आहे. कापूस पिकाच्या […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातल्या बळीराजावर कायम संकटांची मालिका ओढावली आहे. अवकाळी पाऊस, हातात आलेलं पिक वाया जाणं, वादळी वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पिक वाया गेलं. परंतू कालांतराने कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्यात अच्छे दिन आल्याचं चित्र पहायला मिळतं आहे. अकोल्याच्या अकोट येथील बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल ११ हजारांचा भाव मिळतो आहे.

हे वाचलं का?

कापूस पिकाच्या इतिहासातला हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मानला जात आहे. गेल्या काही वर्षांच्या काळात कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळी, ओला दुष्काळ आणि नापिकीच्या दुष्टचक्रात अडकला होता. परंतू यानंतर कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरही समाधानाचे काही क्षण पहायला मिळत आहेत.

यावर्षीच्या हंगामातील कापसाला मिळत असलेल्या भावानं शेतकऱ्याच्या आयुष्यात आनंद आणि उमेदीची नवी पालवी फुललीये. ‘यावर्षी सीसीआयनं कापसाच्या मध्यम धाग्याला ५ हजार ७७५ तर लांब धाग्याला ६ हजार १०० एव्हढा हमीभाव जाहीर केला आहे. त्यामूळे अकोटमध्ये हमीभावापेक्षा क्विंटलमागे जवळपास ५ हजारापेक्षा अधिक भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे.

काय आहेत अकोट येथील बाजारात कापसाला जास्त भाव मिळण्यामागची कारणं?

१) अकोटमध्ये जिनिंगचे तब्बल २० युनिट आहेय.

२) येथील जिनिंगला दररोज १५ हजार क्विंटल कापसाची आवश्यकता पडतेय.

३) वऱ्हाडातील कापसात रूईचे प्रमाण अधिक आणि सरकीची जाडी कमी. यामूळे बाजारात या कापसाला चांगलीच मागणी.

४) येथला कापूस पुढे बांग्लादेश आणि चिनमध्येही निर्यात होतो.

    follow whatsapp